Skip to main content

ओपन'साठी २० तर 'ट्रायबल'साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा ट्रायबल फोरम : परदेश शिष्यवृत्तीत अन्याय


नंदुरबार : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वच घटकांसाठी परदेश  शिष्यवृत्ती योजना आहे. यात सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी  उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये आहे  अन् अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी केवळ ६ लाख रुपये आहेत.उत्पन्नाच्या फरकामुळे सर्व सामान्य आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही.ही बाब अन्याय करणारीआहे.त्यामुळे आदिवासींचीही उत्पन्न मर्यादा वाढवून २० लाख करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २००५ पासून परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविल्या जाते.याकरिता शिष्यवृत्तीची योजना असून उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये आहेत.यात भूमिहीन आदिवासी कुटुंबातील, दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांस प्राधान्यक्रम दिला आहे.

त्या विद्यार्थ्यांपर्यंत एकतर योजना पोहोचली नाहीत.कदाचित काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीही असेल पण योजनेविषयी अज्ञानामुळे आणि गरीबीमुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात मजल मारली नाही.
उत्पन्नाच्या अटी व शर्तीमुळे सर्व सामान्य आदिवासी कुटुंबातील विद्यार्थीही योजनेला मुकले आहे. परिणामतः परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळू शकला नाही.

दुसऱ्या बाजूला शासनामार्फत हीच योजना सर्व साधारण गटातील म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीताही राबविण्यात येत आहेत.परंतू त्यांच्यासाठी किचकट अटी व शर्ती नाही.आणि उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजनेतील उत्पन्न मर्यादा खुल्या संवर्गाच्या तुलनेत आदिवासींची उत्पन्न मर्यादा कमी निर्धारित केल्यामुळे अन्याय झालेला आहे.त्यामुळे ते परदेशातील उच्च शिक्षणासाठी असलेल्या लाभाचा फायदा घेऊ शकले नाही.

*विद्यार्थी क्षमताही १०० करावी*
आदिवासी समाजातील विद्यार्थी  परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले पाहिजे.याकरिता सद्यस्थितीत परदेश शिक्षणासाठी असलेली १० विद्यार्थी क्षमता बदलवून ती १०० करण्यात यावी.आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी उमेदवार किंवा पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी.
- नितीन तडवी जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम नंदुरबार.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...