Skip to main content

शिक्षक दिन

सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निस्वार्थ भावनेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांना उच्च स्थानावर पोहोचवण्याचे श्रेय केवळ शिक्षकांना जाते.शिक्षक हे आपले दुसरे पालक आहेत.आपल्यावर प्रभाव पाडण्यात आणि प्रेरित करण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपला आदर्श मानतो. पालकांनंतर, प्रत्येक टप्प्यावर मुलाचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे आज शिक्षकांना आणि त्यांच्या अथक परिश्रमांना सलाम करणे हे आपले परम कर्तव्य आहे.शिक्षक आणि माळी हे दोघे सारखेच असतात जसं माळी एकाच बागेत विभिन्न प्रकारची सुंदर फुले फुलवतात तसेच शिक्षक सुद्धा अनेक विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडवून त्यांच्या सुगंधाने समाज सजवण्याचा प्रयत्न करत राहतात. काट्यात राहून फुलण्याचे सामर्थ्य जसे फुलांच्या अंगी असते तसेच सामर्थ्य आणि बळ आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी यासाठी ते अविरत झिजत राहतात.शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून समाजामध्ये उच्च दर्जाचे जीवन जगण्याची कला शिकवतात. शिक्षक आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती असते. ते आपल्या ज्ञानाची झाडे रुजवतात, विचारांमध्ये दिशा दाखवतात, आणि आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी सदैव प्रयत्न करतात. शिक्षकांमुळेच आपण चांगले नागरिक बनू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते.
           आपण जेव्हा शाळेत प्रवेश घेतो त्यावेळी एक मातीचा गोळा असतो ज्याची बाजारात काहीच किंमत नसते. शिक्षक त्यांच्या कौशल्याने त्या मातीच्या गोळ्याला सुबक आकार देऊन सुंदर घडा घडवतात आणि त्याची किंमत वाढवतात.शिक्षक, मास्तर,गुरुजी आणि सर अश्या नावाने हाक मारल्या जाणारा तो व्यक्ती निर्विकार राहून आपलं कर्तव्य पार पाडत असतो.हसत खेळत पाठ्यपुस्तकातील धडे शिकवताना नकळत जीवन जगण्याचे धडे आपल्याला देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.काही वर्षांपूर्वी पर्यंत शिक्षकाचा धाक असायचा आणि शिक्षक दुरून जरी जात असले तरीही विद्यार्थी घाबरून जात असतं.कालांतराने ही स्थिती बदलत गेली आणि आज एकंदरीत परस्थिती काही वेगळी पाहायला मिळते.मुलगा शाळेत जात नसेल तर त्याला चांगला चोप देऊन शाळेत पाठवण्यात येत असत.आमच्या वेळी तर शाळेतून ४-५ मुलं घरी येऊन उचलबांगडी करून घेऊन जायचे."छडी लागे छमछम विद्या येई घमघम" ही म्हण प्रचलित होती.आज सहजच म्हटले जाते की "शिक्षकाच्या हातून छडी सुटली आणि हा समाज बेशिस्त झाला".त्यांचे योगदान केवळ शाळांपुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशासाठी विस्तारलेले आहे. त्यामुळे पालकांनंतर शिक्षकांना योग्य मान दिला पाहिजे.
      खरच आपल्या आई वडिलांच्या लहानपणी जी शिक्षण पद्धत होती त्यात पालक कधीच शिक्षक आणि पाल्य यांच्या मध्ये पडत नसे. हाता पायावर छडीचे वळ घेऊन आलेल्या मुलाला वरतून आई वडील सुद्धा शिक्षा करत.आज शिक्षकांना ती मुभा नाहीये कारण पालक सहजच शिक्षकांना म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना कधीच हात नाही लावत तुम्ही का मारता.आज शाळेतील पूर्ण वातावरण भरपूर प्रमाणात बदलत असताना दिसून येत.शालेय शिक्षणा व्यतिरिक्त पीटी ,मैदानी खेळ आणि संपूर्ण विकास व्हावा म्हणून खरी कमाई असे उपक्रम असायचे.शिक्षक या सर्वांना अतिशय महत्त्व देत आणि आपल्या कडून हे सर्व करून घेताना एवढाच उद्देश असायचा की आपला विद्यार्थी या जगाच्या शर्यतीत कुठेही मागे राहता कामा नये.कोणताही शिक्षण आपल्या विद्यार्थ्यासाठी कधीच वाईट विचार करत नाही.
       माझ्या वर्गमित्रा पैकी बहुतांश शिक्षक आहेत आणि जेंव्हा त्यांच्या विषयी ऐकायला मिळत तेंव्हा आश्चर्य वाटत की अनेक प्रकारे त्रास सहन करत त्यांना शाळे पर्यंत पोहोचावं लागतं.खराब रस्ते,नदी ओलांडून जाणे किंवा जंगलातून जाणारा रस्ता किंवा सगळं व्यवस्थित असेल तर गावातील लोकांचा कमी प्रतिसाद यामुळे त्यांच्या कितीही मनात असलं तरी हव्या त्या प्रकारे त्यांना काम करता येत नाही.शासकीय कामात येणाऱ्या अडचणी कधी कधी शाळेच्या विकासात बाधा बनून उभ्या राहतात.एक शिक्षिका बोलता बोलता म्हणाली की मुलांचं शाळेत मन रमावं यासाठी मुलांना आवडणारे कार्टून  भिंतीचीत्र,बगीचा सुशोभीकरण आणि वर्गखोल्याची डागडूज ही बदलत्या काळा प्रमाणे व्ह्यायला पाहिजे.एका गावातील सर्व घरांवर शाळेमार्फत अंक पाढे,गणितीय समीकरणे आणि मुलांना आवश्यक असणारे शालेय अभ्यासक्रमातील पाठ रंगवून मुलांना चालता फिरता शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली.असे उपक्रम फार खर्चिक नसतात परंतु याचा सकारात्मक प्रतिसाद अथवा परिणाम नक्कीच पाहायला मिळतो.शिक्षक अश्या अनेक छोट्या छोट्या बाबितून उन्नत समाज घडवण्याचा ध्यास घेऊन देशाच्या विकासात आपले योगदान देत असतात.विद्यार्थी घडताना पाहून आई वडीलांपेक्षा जास्त आनंद शिक्षकांना होत असतो.आपण शिकवलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून कुणी उच्च पदावर पोहोचतो तर कुणी उद्योग व्यवसायात यशस्वी होतो हे सर्व असताना शिक्षक मात्र आहे त्याच ठिकाणी उभा असतो परत एक नवा वर्ग घडवण्यासाठी.
खरचं शिक्षकांच्या योगदानासाठी केवळ सत्कार आणि गळाभर हार पुरे नसून त्यांच्या भावनेची कदर करणे आवश्यक आहे.त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिल तर परत एक प्रगत आणि संस्कारी समाज घडवण्याचा त्यांचा मानस नक्कीच पूर्ण होऊ शकतो.

पवन श्रीरंगसा कुसुंदल
नंदीग्राम सोसायटी ,नांदेड
संपर्क:९०७५५९५६९५

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...