Skip to main content

'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र


दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी 10.00 वाजता गुगल मीट वर 'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र’ या कार्यक्रमाचे  आयोजन या चळवळीचे मुख्य स्तोत्र मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे सरांनी चालू केलेल्या या चांगुलपणाच्या चळवळीला विश्वातील प्रत्येक माणसापर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. 'चांगुलपणाची चळवळ' या नावातच त्याचा व्यापक अर्थ दिसून येतो. 'सर्वजन सुखाय सर्वजन हिताय' या विचाराने फक्त महाराष्ट्र किंवा भारतातीलच नाही तर संपूर्ण विश्वातील लोकांना मुळे सरांनी प्रभावित केले आहे. चांगुलपणाच्या या चळवळीत संपूर्ण विश्वातील लोक जोडली गेली आहेत. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य व समता या उद्देशांना डोळ्यास‌मोर ठेवून चांगली माणस, चांगल्या संस्था आणि चांगले विचार यांना एकत्र करणारी ही ‘चांगुलपणाची चळवळ’ डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकजण विविध उपक्रमांतून  राबवत आहेत.


'चांगुलपणाची चळवळ – एक चर्चासत्र’ या चर्चासत्रामध्ये डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर यांचे मुख्य मार्गदर्शन आपणा सर्वांना मिळणार आहे. तसेच मा. संजय मुळे सर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. मा.श्री. अनिल नानीवडेकर सर, मा. धनश्री पाटील मॅडम, मा. अनिता नलगे मॅडम, मा. नेहा कुमार मॅडम, मा. आयेशा सय्यद मॅडम, मा. प्रकाश गाताडे सर, मा शिवाजीराव शिंगे सर  असे मान्यवर या चर्चासत्रामध्ये सहभागी होऊन चांगुलपणाच्या चळवळीबद्दलचे मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या आयोजिका व पलपब प्रकाशनाच्या कार्यकारी अधिकारी सौ लिना पाटील मॅडम यांनी केले आहे.
To join the meeting on Google meet, click this link - https://meet.Google. ccom/oir -hfce-iyk

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...