Skip to main content

*विषय- माझे आवडते शिक्षक*



 *गुरु ब्रम्हा गुरु विष्णु* 
 *गुरूदेवो  महेश्वरा* 
 *गुरुसाक्षात परब्रम्ह* 
 *तस्मै:श्री गुरवे नमः-----* 

 माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन.
       कारण,  आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते.
" नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा"
 गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या,  प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर.
आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे  नमले. 
     सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी,  उच्च विचारसरणी चे माझे गुरु आणि माझी गुरुमाय. 
 कधीही त्यांच्या घरी गेलो की,  सारवलेलं अंगण,  रेखाटलेली रांगोळी,  आणि तुळशी वृंदावन, बाजूला पारिजातकाचं झाड, आणि फुलझाडांची छोटीशी बाग. एवढ पाहून मन कस प्रसन्न व्हायचं. वाटायचं इथं सुंदर विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे.
      घरात गेल्यावर, प्रसन्न मुद्रेने गुरूंनी मला म्हणावं, "ये घरात काय काम काढलेस? बस समोर. आणि आत बाईंना निरोप द्यायचे, "अगं, वाटीत सातूच पीठ आण" सातूचं पीठ कालवून किती गोड लागायचं !म्हणून सांगू.  
      वाटायचं काय सेवा करू यांची.? सात जन्म घेऊन घ्या गुरूंचा सेवेत रहावस  वाटतं!आपण आयुष्यात आपणास कोणीही गुरुस्थानी मानु शकतो, आई, वडील, गुरु, संत, असोत.
             आज हायस्कूल, कॉलेजात,  प्रोग्राम होतात. पार्ट्या होतात कोणी राजकीय नेता येतो. कोणी सिने अभिनेता येतो. उद्घाटनाला गावात अनेक नवनवीन कार्यक्रम होतात. त्यांचे मोठाले फोटो झळकतात  सर्व रस्त्यावर. आम्हाला संस्कार आदर भाव,  सेवा शिकवणाऱ्या माझ्या प्रेमाळ गुरूंची कोणाला आठवण येत नाही. उलट गुरुजी असे, गुरुजी तसे, म्हणून हेटाळणी केली जाते. याचे मला खूप वाईट वाटते. खरी पिढी घडवणारा तो एक शिल्पकार आहे त्या गुरूंना कायमचा दुय्यम स्थान का दिले जाते?               
       *एका ठिकाणी तर अध्यक्ष स्थानी* *अधिकारी झालेला विध्यार्थी* *स्टेजवर बसलेला आणि* त्या *कार्यक्रमाचे सूत्र संचलन* *करणारा* *त्याचे गुरु स्टेजच्या खाली ते* *बघुन मी निशब्द* *झाले.आणि विशेष म्हणजे* ही *गोष्ट  कोणाच्या लक्षातही* *आली नाही. आपल्या* *हातात हात घेवुन अक्षराला वळण* *देणारा गुरु आपण विसरून* *कसा चालेल ?* 
 *एखाद्या कार्यक्रमाच्या उदघाट्नला* *गुरुजी नसतो त्याने* *घडविलेला एखादा अधिकारी असतो.* 
        माझ्या गुरूंनी  दिलेला संस्काराचा,  आदर्शाचा वारसा आम्ही कायम चालवू. मागील वर्षी मला माझे गुरु बाजारात भेटले,  मी भर बाजारात त्यांच्या पाया पडले. त्यांनी विचारले "काय करतेस"?  मी अभिमानाने सांगितलं "गुरुजी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवले मी.  सार्थ अभिमान वाटला माझ्या गुरूंना माझा.त्यांची मी शिष्य आहे. याचा अभिमान वाटतो. मी घरातही माझ्या गुरूंचा महिमा सांगते. 
"गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,  
आम्ही चालवू हा,  पुढे वारसा!

 *शीला  पाटील. चांदवड*

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...