Skip to main content

*५ सप्टेंबर "शिक्षकदिन"**औचित्य साधून**विषय:- डॉ. सर्वपल्ली* *राधाकृष्णन् व्यक्ती आणि व्यक्तिमत्व*

   ५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण भारतभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो.
   गुरुजन हे वंदनीय आहेत परब्रम्ह स्वरूप आहेत. या वंदनीय अशा गुरुजींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर ५  सप्टेंबर हा 'सर्वपल्ली राधाकृष्णन 'यांचा जन्मदिवस साजरा करतो.
   राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी  गावी झाला. नेहमी प्रथम वर्गात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
     त्यानंतर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा पत्करला. तत्त्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने देश विदेशात गाजली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास धर्मनितीशास्त्र व तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यानांसाठी सन्मानपूर्वक बोलवले होते.
     ते वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते.१९३१  ते १९३९ पर्यंत ते राष्ट्र संघात भारताचे प्रतिनिधी देखील होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. १९५२ ते १९६७ पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले.
   धर्म व तत्वज्ञान यावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान आले पाहिजे  आणि आपल्या विचारांची दिशा ठरवता आली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
   स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा 'जन्मदिन' हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.
   अनादी कालापासून आपल्या देशामध्ये शिक्षकाचे स्थान अतिउच्च मानले  आहे. शिक्षक हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य देण्यासोबतच शीलवान,नीतिमान व राष्ट्र प्रेमाने प्रेरित युवा मने विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
   ज्ञानदानाबरोबर उद्याचे संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भावी पिढीला विज्ञाननिष्ठ जगामध्ये जीवनाच्या स्पर्धेत ठामपणे उभे राहण्याचे सामर्थ्य जर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचे असेल तर तो केवळ शिक्षक हे कार्य करू शकतो.
   अशा या शिक्षकाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मिळावी म्हणून डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. प्रत्येक शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ठिकठिकाणी विविध पुरस्कारांचे आयोजन केले जाते.
   अशा या महामानवाला माझे मनापासून वंदन.

 वसुधा वैभव नाईक 
 धनकवडी जिल्हा पुणे
मो. नं. 9823582116

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...