...मुंबई प्रतिनिधी...गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस नेते सुनील कुमरे यांनी यंदा गणेशोत्सवा निमित्त दिनांक १५ सप्टेंबर रोजी अंधेरी चकाला येथील होम फॉर एज या वृद्धाश्रमात कार्यकर्त्यांसह जाऊन जवळपास शंभर वृध्दाशी संवाद साधून त्यांची सुख दुःख जाणून घेऊन त्यांना अनेक प्रकारची फळे, साबण, तेल बॉटल, दूध पावडर, चहा पावडर आदी वस्तू देऊन सहकार्य केले. कुमरे यांचे काम चांगले असून ते विभागातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात.अनेक मंडळे आणि सामाजिक संस्थांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत.
कुमरे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष समाजसेवक असल्याने त्यांचा मोठा आधार असल्याचे अनेकांनी वारंवार बोलून दाखविले आहे. यंदा कुमरे यांनी कोणतेही शुभेच्छा बॅनर न लावता त्या रकमेमधून या वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले. वाढदिवस आणि इतर अनेक शुभ प्रसंगी होणारे मोठ मोठे खर्च आपण नक्कीच टाळायला हवेत आणि या बचती मधून गरजूंना सहकार्य करायचे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले आहे.वस्तू वाटप करण्यासाठी धर्मराज तोकला, राहुल ढवळे, संतोष बागवे, बाळासाहेब जाधव, सतीश सिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment