Skip to main content

*सचिन बेंडभर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार*


ता.02 ( पुणे प्रतिनिधी)
           वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा आणि शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
          शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा यावर्षी हा बहुमान महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेली शाळा व गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीला मिळाला असून या शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्राप्त झाला.
        पुणे जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांची आजपर्यंत ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या कळो निसर्ग  मानवा या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात केली आहे. तसेच मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाचा या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) द्वितीय वर्षीच्या अभ्यासक्रमात पुढील पाच वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे.
      स्वतः लिहीत असताना त्यांनी  विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता,शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके संपादित  करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत. सध्या ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित समग्र शिक्षा अंतर्गत पुस्तक निर्मिती कार्यशाळेत जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांना पुस्तक निर्मितीसाठी मार्गदर्शन करत असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात बालसाहित्यिक घडविण्याचे त्यांचे ध्येय आहे.
      बेंडभर यांच्या या घवघवीत यशाबद्दल आंतरराष्ट्रीय शाळा मुख्याध्यापक विजय गोडसे, वाबळेवाडीचे निर्माते व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे, सणसवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्रापूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर व बाळकृष्ण कळमकर, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...