Skip to main content

*गणपती बाप्पा मोरया*

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
या ओळी ऐकल्या म्हणजे आपोआप बाप्पा मोरयाची साजिरी सुंदर मूर्ती डोळ्यासमोर येते. अशावेळी मनाला होणारा आनंद हा शब्दात व्यक्त करणे कठीण. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रताच्या निमित्ताने बाप्पाच्या दर्शनाने मन प्रफुल्लित, प्रसन्न होणे म्हणजे काय असतं ते स्वतः अनुभवणे गरजेचे असते.

प्रत्येकाला आपापल्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पा मोरयाविषयी वाटणारी ओढ, जिव्हाळा अगदीं अवर्णनीय.  ६४ कला आणि १४ विद्या यांचा अधिपती असलेल्या लाडक्या बाप्पाच्या स्मरणाने भक्तांच्या मनाला एक विशेष ऊर्जा आपोआप प्राप्त होते.

शिव पार्वतीचा लाडका सुपुत्र गणपती बाप्पा लहान थोर सर्वानाच आवडतो. लाल रंगाची जास्वंद फुले, हिरव्यागार दुर्वा आणि चविष्ट असे उकडीचे मोदक असा असतो बाप्पाच्या पूजेचा थाट.

प्रत्येक नवीन कार्याच्या शुभारंभाला प्रथम पूजेचा मान श्री गणेशाला दिला जातो. शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन पुढचे सर्व काही मंगलकारक व्हावें, हा त्यामागचा हेतू असतो. श्री गणेश ही देवता बुध्दीची, सिद्धीची असल्यामुळे अभ्यासात देखील गणरायाचे साह्य मिळावे यासाठी विद्यार्थी मनोमन मोरयाची प्रार्थना करतात.

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाला असल्याने अनेक दिवसापासून गणेश चतुर्थी उत्सवाची जय्यत तयारी सुरू होते.
सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले म्हणजे गणेश चतुर्थी लवकरच येत असल्याची खात्री होते.

वर्षभराच्या कालावधीत गणरायाचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आपापल्या परीने जरी संवाद साधत असला, तरीही घरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या दर्शनाने नव्या दिवसाची होणारी सुरुवात मन प्रफुल्लित करणारी असते हे विशेष.

जगण्याचे बळ प्राप्त करून देणारा गणपती बाप्पा मनोमन प्रार्थना केली,  म्हणजे नक्की ऐकतो, समजून घेत असतो.  प्रत्येकाला मानसिक बळ आधार मिळवून देण्याचे सामर्थ्य मोरयाच्या नावात असते हे सांगायला नकोच.
गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र मंत्र उच्चाराने मनात असलेला कुविचार, दुःख दूर होण्यासाठी मदत होते. गणपती बाप्पाची कृपादृष्टी ही गोष्ट खरी म्हणजे शब्दातून व्यक्त करण्यापेक्षा ती स्वतः अनुभवणे आवश्यक आहे.
साखरेची गोडी जशी स्वत: चाखल्या शिवाय समजत नाही, त्याचप्रमाणे गणरायाच्या दर्शनाने मिळणारा आनंद स्वतः अनुभवून पहावा लागतो. 
 
मुषकाचे वाहन छान
 डोळे इवले मोठे कान
माझ्या लाडक्या बाप्पाला
पहिल्या पूजेचा मान 

प्रत्येकाला नवीन ऊर्जा मिळवून देणारा देव म्हणजे

गणपती बाप्पा मोरया 


*सचिन पाटील*
*(अलिबाग रायगड)*

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...