माझी खिल्लारी बैलाची जोडी
मोत्या पोवळ्या नावं त्यांची
रुबाबदार जोडी सर्वांना आवडी
मेहनतिने काळजी घेतात शेताची
शेतकऱ्यांना आधार बैलांचा
कामात उरक असे शेतीचा
लक्ष्मी ही शेतकऱ्यांची,,,,
शोभा वाटे अंगणाची,,,,,
वर्षाचा सण हा बैलपोळा
शेतकरी आनंदाने साजरा
करतो आवडीने सोहळा
झुल अंगावरी हाती कासरा,,,,,
नवरदेव रंगतो विविध रंगानी
गळ्यात सुंदर घुंगर माळा,,,,
शिंग शोभतात लोंबणाऱ्या गोंड्यानी
मिरवणूकित उडवतात धुराळा,,,
जेवण आज त्यांना पुरणपोळीचे
मुटकुळे बाजरीच्या पिठाचे,,,,,
ओवाळते सुवासिन जोडीला
वर्ष सरते कष्टात शेतकऱ्याचे,,,,,
दत्तकन्या
Comments
Post a Comment