Skip to main content

कवी, निवेदक, मा. अँड. उमाकांत आदमाने यांना विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ जाहीर




पुणे दि. २०ऑक्तोबर २०२४ रोजी कवी,लेखक, निवेदक, मा. अँड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ संस्थेचे अध्यक्ष / संस्थापक मा. श्री. शशिकांत कोचळे यांनी जाहीर केला.
   
कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने मूळ गाव बोरगाव काळे, जिल्हा लातूर परंतु सध्या स्थायिक पुणे येथून विविध सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक चळवळीत सक्रीय असे कार्य सतत करत आहेत. कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने हे सन २००९ पासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे वकीली व्यवसाय करीत असून सन २०२० मध्ये त्यांची भारत सरकार नोटरीपदी निवड झालेली असून नोटरी व्यवसाय सुद्धा प्रामाणिक पणे करीत आहेत, वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात साहित्यिक विश्वात यशस्वी प्रवास करत या अगोदर साहित्य क्षेत्रात ९५ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर येथे शांता शेळके कवी कट्टा वर आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे प्रा. देविदास सोटे कवी कट्टा वर नुसत्या तुझ्या असण्याने, आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, व ९७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगाव येथे प्रेमकविता मोठ्या आनंदाने सादर केली. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक जिल्हास्तरीय,राजस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

त्यांचे ध्येय हेच की जनसेवा हीच राष्ट्रसेवा समजून काम करणे, हे असून शैक्षणिक व सामजिक बांधिलकी या विचारातून अनेक गरजुवंत विध्यार्थाना शैक्षणीक साहित्य, गणवेश वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे, तसेच ते मुळचे लातूर या गावाचे असून किल्लारी येथे झालेल्या भूंकपग्रस्त कुटुंबातील मुले आणि मुलींच्या सहभागातून त्यांना आर्थिक, सामाजिक, मग ती धान्य मागून त्यांच्यापर्यंत नेऊन देण्याचे काम त्यांनी घडवून आणलेले आहे, तसेच NSS च्या माध्यमातून गाव मौजे पुणे, लातूर, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, नांदेड, राजस्थान, बेंगलोर येथे जाऊन दहा दिवसीय शिबिरात सहभाग घेऊन ‘पाणी संरक्षण’ “पाणी आडवा पाणी झिरवा” हा संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरविण्याचे आतिशय मोलाचे काम करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...