Skip to main content

*परिसंवाद - पाली भाषा व मराठी भाषा*

      मंगळवार दि.५ नोव्हेंबर २०२४ धम्मदीप सभागृह शहापूर जि.ठाणे येथील धम्मदीप कल्चरल संस्थेच्या सभागृहात पाली भाषा व मराठी भाषे संदर्भात परिसंवाद पार पडला.निमित्त होतं दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पाली भाषा,मराठी भाषा व इतर सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. यावेळी पालेभाषे संदर्भात उद्बोधन करण्यासाठी पालेभाषेचे सन्माननीय प्रा.डॉ.सुरेश मानाजी सोनोने सर (पाली भाषा विभाग प्रमुख राजर्षी शाहू महाविद्यालय- लातूर) त्याच प्रमाणे मराठी भाषेवर उद्भोधन करण्यासाठी मराठी भाषेचे सन्माननीय प्रा.संजय निचिते सर (गोल्ड मेडलिस्ट एम ए इन मराठी - मुंबई विद्यापीठ) हे उपस्थित होते. सोबत धम्मदीप संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश पवार सर,भिमाई पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर उबाळे सर, मैत्री संघाचे अध्यक्ष व नाटककार सन्माननीय बाळासाहेब थोरात सर ( माजी कस्टम ऑफिसर) तसेच सोनोने सरांच्या सहचरणी डॉ. वैशाली सोनोने (पाली- पी.एच.डी.) सरांची मुलगी स्नेहा सोनोने (पाली पी.एच.डी.) व सरांचा मुलगा दिग्विजय सोनोने (पाली पी.एच.डी.) तसेच सरांची दुसरी मुलगी डॉ.दिव्या सोनोने (एम.डी.नेत्र तज्ञ)उपस्थित होते. त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील ओ.बी.सी. महासंघाचे नेतृत्व करणारे सन्माननीय भरत निचिते सर, इत्यादी मान्यवर व सर्व प्रिय श्रोतेजन उपस्थित होते. डॉक्टर सोनोने सर आपल्या मनोगतनातून बोलतांना त्यांनी पृथ्वीची उत्पत्ती, मानवी उत्क्रांती व मानवाची भाषा उत्क्रांती यावर बोलून प्राचीन भारतातील पालीभाषा कशी लुप्त झाली व आज पाली भाषेचे फायदे कोणते व समाजाची गरज काय यावर विस्तृत मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे सन्माननीय प्रा. संजय निचिते सर यांनी मराठी भाषेचे प्राचीनत्व सांगून मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्व परिसंवाद श्रवण करून पालीभाषा व मराठी भाषेविषयी साधक बाधक चर्चा केली.व उपस्थितांच्या शंका व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.सोबत इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले.मी संतोष रामचंद्र जाधव (पालिभाषा व धम्मलिपी सन्मवयक-बोरशेती) आभार प्रदर्शित करून कार्यक्रम समाप्ती झाली.)

संतोष रामचंद्र जाधव(बोरशेती)
परिस्पर्श स्वप्नोत्सव शहापूर जि. ठाणे 7507015488

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...