Skip to main content

श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान...


पुणे जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी श्री दिनेश ताराचंद खैरे यांना नेपाळ राज्यातील लुंबिनी शहरामध्ये आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय हिंदी कविता स्पर्धेच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय मानद उपाधि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   देवनागरी लिपीचे संरक्षण , नेपाळ भारत मैत्री मजबूत करणे, आणि नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदी  कविता स्पर्धेमध्ये श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
    श्री दिनेश खैरे हे नवोदित कवी साहित्यिक आहेत. त्यांनी शिक्षा आणि साहित्य, संस्कृती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे योगदान दिले आहे, त्यांनी वृत्तपत्रे, मासिके,  साप्ताहिके  दिवाळी अंक यासारख्या माध्यमातून साहित्य लेखन केले आहे. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित सुद्धा झाली आहेत. त्यांना अनेक राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
    शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळ मार्फत आयोजित वैश्विक हिंदी आंतरराष्ट्रीय कविता स्पर्धेमध्ये  देश विदेशातील 982 कवींनी सहभाग घेतला होता. त्यातील 120 कवींना उत्कृष्ट काव्य लेखनास करिता 'हिंदी आयडल मानद उपाधी सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
    शब्दप्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळ ही संस्था अनेक सामाजिक ,सांस्कृतिक, मराठी हिंदी इंग्रजी भाषा संवर्धनासाठी काम करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ती प्रसिद्ध आहे ही संस्था अनेक क्षेत्रातील कवी नवोदित साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन कार्यक्रमाचे आयोजन असते .या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंदगिरी मायालु सर म्हणतात की कोणत्याही कवी साहित्यिकाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांच्यातील असलेली प्रतिभा शक्ती जागृत होते. आणि त्यांच्यातील लेखन क्षमता वाढीस लागते. यातूनच उत्कृष्ट सृजनशील साहित्य निर्माण होते. 
    श्री दिनेश खैरे यांना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा.प्रा. श्री सचिन सानप(सर) नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार सर, प्रबंधक श्री राजेंद्र तागडे सर, डॉ. अशोक उबाळे( सर ) सहसंचालक, (उच्च शिक्षण )विभाग पुणे. डॉ.अर्चना बोऱ्हाडे ( मॅडम) प्रशासन अधिकारी (उच्च शिक्षण) विभाग पुणे, श्री अरविंद भागवत सर, श्री माणिक मुंढे सर, श्री बाळासाहेब पोटे सर, श्री विनायक चव्हाण सर,श्री विजय सावतकर सर ,माजी गटशिक्षणाधिकारी श्री ए . बी पाटील सर, प्रा. सौ संजीवनी पाटील मॅडम, श्री देवीदास जामदार गुरुजी, श्री शिवाजीराव हराळे मास्तर, श्री सतीश गोगावले, श्री राम यादव सर आदींचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...