Skip to main content

शब्द माझे तुझ्याचसाठी " आणि "मयूरस्पर्श " प्रकाशित

 
    उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या  साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे  कवयित्री अश्विनी सचिन बोलके यांचा 'शब्द माझे तुझ्याचसाठी' हा काव्यसंग्रह तसेच कवी मयूर महादेव पालकर यांचा 'मयूरस्पर्श' हा चारोळीसंग्रह नवीन पनवेल येथील अभियंता भवन, आकुर्ली येथे प्रकाशित झाला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री,शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असं असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते. 
सदर मान्यवरांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे अनावरण केले गेले. कवयित्री अश्विनी बोलके आणि मयूर पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुगटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सक्रिय कार्यकर्ते संजय पालकर यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या तर  पल्लवी काळे यांनी 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकातील 'ऋणानुबंध' ही कविता सादर केली. कवयित्री हिरकणी गीतांजली वाणी यांनी 'मयूरस्पर्श' चारोळीसंग्रहास शुभेच्छा दिल्या तर कवयित्री प्रियंका कोठावदे आणि कवयित्री रजनी येवले यांनी 'मयूरस्पर्श' चारोळीसंग्रहातील काही निवडक चारोळ्या सादर केल्या.  दुर्गेश सोनार यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकाबद्दल,"या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात,इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत." असे बोल व्यक्त केले. "मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श", अशा शब्दांत कवयित्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूर पालकर यांच्या 'मयूरस्पर्श ' विषयी आपले मनोगत व्यक्त केले.जेष्ठ  साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गझलकार सन्माननीय ए. के . शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे प्रकाशन झाले असे जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर ह्यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.सचिन बोलके ह्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...