Skip to main content

समाज परिवर्तन करण्यासाठी ज्या सदैव आपल्या विचारातून कर्मातून प्रयत्न करत असतात अशा मार्गदर्शिका , लेखिका आम्रपाली धेंडे मॅडम यांचे नाटक कलांतर ......एक हृदयस्पर्शी कथा ...दिग्दर्शक चिन्मय मायदेव


दिनांक : 9/11/20224 रोजी डोंबिवली पूर्व या ठिकाणी कलांतर.... एक हृदयस्पर्शी कथा हे नाटक संपन्न करण्यात आले लेखिका आम्रपाली धेंडे यांनी या नाटकातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाटक प्रत्येकाने पाहून कुटुंबा चा  दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला आहे . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे मत लेखिका आम्रपाली धेंडे यांनी व्यक्त केले आहे. मुलांना समजून घेऊन त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना प्रेम दिले पाहिजे . या नाटकाचे सुंदर असे दिग्दर्शन चिन्मय मायदेव सरांनी केले आहे . चिन्मय सर यांच्यात ही एक छान कला आहे सर्वांना एकत्रित घेऊन छान असे दिग्दर्शन करतात त्यामुळे अभिनय हा छान प्रकारे पार पडला जातो तसेच तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे  रश्मी वर्मा  ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल )
 मनाने पाटील .. समाजसेविका 
 प्राजक्ता बर्वे   :: नृत्य विशारद 
 स्मिता माटेकर .. Model या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून समजा मध्ये छान परिवर्तन घडून येईल आणि हे नाटक प्रत्येकाने पहावे असे आपले मत व्यक्त केले आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील सांगण्यात आले . नाटकातील सुंदर विचार दृष्टिकोन पाहून प्रमुख पाहुणे यांनी खूप कौतुक करून समाजामध्ये बदल निर्माण आपण करूया असे आश्वासन दिले 
             अभिनय सर्वांनी खूप छान प्रकारे सादर करून सर्वच कलाकारांनी साथ देऊन समाजामध्ये सुंदर विचार मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे . प्रत्येकाने खूप प्रयत्न करून हे नाटक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाने कामातून वेळ काढून सुंदर असे नाटक सादर केले आहे त्यामुळे सर्व कलाकारांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्याचप्रमाणे सूत्रसंचालन उत्तमरीत्या स्नेहा केसरकर यांनी पार पाडले या सूत्रसंचालनातून त्यांनी अनेकांची मने जिंकले 
          माधुरी पुजारी, दीपक खेमकर ,स्मिता भीमनवार ,नक्षत्र वराळे ,आरती यादव ,सुप्रिया कुंभार ,रसिका कुलकर्णी ,प्रमिला शिरसाठ ,मनीषा खेमकर, गुंजन पाठारे ,स्वराज पाटील ,चित्रा खरे, प्रतिभा काळे ,वृषाली देशपांडे ,मीनाक्षी जोशी या सर्वांनी अप्रतिम असे नाटकातून समाजकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे या नाटकाचे कौतुक होऊन सर्वांचे अभिनंदन होत आहे या नाटकासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेते सौरभ गोखले ,अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेत्री अनघा देव, सुप्रसिद्ध तबला वादक वरद कठापुरकर, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेत्री स्वाती करणेकर, अभिनेत्री वैशाली गवळी, अभिनेते अविनाश नारकर या सर्वांच्या भरभरून शुभेच्छा आल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...