ठाणे/प्रतिनिधी : येथील जेष्ठ कवी , लेखक समाजसेवक, पत्रकार प्रा.बाळासाहेब तोरस्कर यांना लेखन अन् मी साहित्य समुह परिवार कोल्हापूर यांचा या वर्षीचा साहित्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी ही त्यांची निवड करण्यात आली आहे .हा सोहळा वरद सभागृह गणेश मंदिर संस्थान , फडके रोड डोंबिवली पूर्व येथे रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लेखन अन् मी साहित्य समुहाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक सतीश सोळांकुरकर , कवी विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तोरस्कर हे साहित्यिक , सांस्कृतिक , सामाजिक, पत्रकारिता व फार्मास्युटिकल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक पदाधिकारी आहेत. ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे सहसंपादक, जायंट गृप आॅफ कोल्हापूर मेट्रो चे माजी अध्यक्ष व कौन्सिल मेंबर, राष्ट्रीय शिक्षक संचेतनाचे राष्ट्रीय प्रवक्ते, भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, काव्य प्रेमी शिक्षक मंचचे राज्य सल्लागार समिती सदस्य आदि पदावर कार्यरत आहेत.
त्यांचे २ कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तोरस्कर यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या निवडी बद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment