Skip to main content

गैरसमज

 

          राहुल आणि मी एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. कॉलेजचा पहिला दिवस होता सगळे अनोळखी होते म्हणून कुणीकुणाशी बोलले नाही.
       आठ दिवस असेच निघून गेले हळू हळू ओळख झाली मुलं मुली बोलायला लागलो मैत्री झाली.
         एक दिवस अचानक नवीन मुलगा वर्गात आला आणि आजच ऍडमिशन घेतलं असं सांगितलं सगळ्यांची ओळख करून घेतली खूप हुशार शांत लाघवी होता राहुल आमची मैत्री लगेच झाली.
       फस्ट सेम झाली आणि आणि आम्हाला सुट्टया लागल्या सगळे घरी गेले. राहुल शिवाय करमत नव्हतं कधी सुट्टी संपते असं झालं होत.
मी राहुल ला कॉल केला तो म्हणाला हा "रूपा "बोल कसा फोन केला.
मी म्हणाले सहज केला सुट्टया संपतील सेकण्ड सेम सुरु होईल अभ्यास वाढेल तेंव्हा जरा अभ्यासाचं नियोजन करावं,,,,,,,,
राहुल म्हणाला हेच कारण आहे ना कि दुसरं काही कारण आहे असेल तर सांग,,,,,,,
मी शांत झाले राहुल हसून म्हणाला करमत नाही का माझ्याशिवाय बोलावं वाटतं कि भेटावं वाटतं येऊ का भेटायला कि प्रेमात पडली आहेस,,,,,,, माझ्याकडे उत्तर नव्हतं.
मी हसले आणि तुझं काहीतरीच म्हणून फोन ठेवला.
          मी विचार करू लागले त्याने माझ्या मानतलं कस ओळखलं त्याच्याही मनात असचं असेल का, तोही माझ्यावर प्रेम करत असेल का?
मी विचारात हरवले होते तेवढ्यात आई आली, म्हणाली रूपा चल आपण बाहेर जाऊन येऊ तुला बर वाटेल मी माझ्या आई बरोबर मावशीच्या घरी गेले. मावशीला खूप आनंद झाला कारण आम्ही खूप दिवसांनी भेटत होतो.
मावशी म्हणाली बर झालं तुम्ही आल्या त्यांचे मित्र व त्यांचा मुलगा येणार आहे मला तुमची मदत होईल,,,,,,,,,
मी म्हणाले सांग मावशी काय करायचं स्वयंपाक कि नाष्टा करायचा आई तू बोलत बस मी तयारी करते. मावशीने सांगितलं छान स्वयंपाक करायचा आहे आम्ही त्यांच्या गावी बदलीला होतो तेंव्हा त्यांनी खूप काही केल आमच्यासाठी खूप प्रेमळ आणि समाधानी लोक आहेत ते त्यांचा मुलगा खूप हुशार आहे तो इंजिनिअरिंग ला आहे सुट्टी मूळे घरी आला करमत नाही म्हणून आपल्या घरी येते आहे.
          आई मावशी बोलत बसल्या मी स्वयंपाक केला वरण भात कोशिंबीर चटणी मटकी, पनीरची भाजी पोळी गव्हाची खीर केली. तेवढ्यात काकांचे मित्र व त्यांचा मुलगा आला मावशीने त्यांचं स्वागत केलं.

रूपा - पाणी आण ग काकांना मी आई ला म्हणाले आई तू जा पाणी घेऊन मी जात नाही अनोळखी लोक आहेत मी कस जाणार आई बर म्हणाली आणि ती पाणी घेऊन गेली.
मी कॉफी करून दिली आई नं नेऊन दिली. त्यांच्या गप्पा झाल्या काका जेवायला वाढा म्हणाले,,,,,,,
मी ताटं करायला घेतली आणि राहुल हात धुवायला बेसिंग कडे आला तो मला आणि मी त्याला बघतच राहिले बोलायचं पण सुचेना काका म्हणाले राहूल हात धुवून जेवायला बस.
            ताट वाढली आणि मी वाढायला पुढे गेले आई पहातं होती ती म्हणाली अनोळखी आहेत ना मग कशी वाढते तू,,,,,, मी लाजले आणि आई ला म्हणाले आता बराच वेळ झाला काका येऊन त्यामुळे काही वाटत नाही वाढते मी,,,,,,,,
           सगळे जेवायला बसले काका स्वयंपाकाचं कौतुक करत होते.. काकांनी सांगितलं सगळा स्वयंपाक रूपा ने केला आहे. राहुल बघतच राहिला मनात विचार करत होता ही दिसायला सुंदर अभ्यासात हुशार घर कामात हुशार नावाप्रमांणे रूपा आहे नाव शोभतं हिला,,,,,,,
       जेवणं झाली मी आवरून ठवलं व हॉल मध्ये जाऊन बसले सगळे गप्पा मारत होते. मावशीने सांगितलं ही माझी बहीण व तिची मुलगी रूपा ही पण इंजिनिअरिंग ला आहे खूप हुशार आहे. राहुल काही बोलणार तोच रूपा म्हणाली हा काय करतो म्हणजे शिक्षण कि जॉब त्याने ओळखलं हिला सांगायचं नाही आम्ही एकाच कॉलेज मध्ये आहोत.
         तिने डोळ्याने खूणवलं तो शांत बसला,,,,,,,
राहुल व काका निरोप घेऊन गेले मी आणि आई घरी आलो,,,,, मनात कुतूहल होत करमत नव्हते म्हणून गेले तर राहुल भेटला मनात आनंद होता एक अनामिक ओढ होती सुट्टी संपायची वाट बघायची होती.
            सुट्टी संपली कॉलेज सुरु झालं रिझल्ट लागला राहुल पहिला तर मी दुसरी आले,,,,,,,,
राहुल म्हणाला सांगितलं का नाही घरी आपण एकाच वर्गात आहोत मी म्हणाले कस सांगायचं होत तू तर मला तू प्रेमात पडली का विचारून ब्लँक केलं होत. मनातील भावना ओठांवर आली असती,,,,,,, 
तो - तू खरंच प्रेमात पडली का 
मी - तू नाही का पडला 
तुझ्या डोळ्यात दिसत म्हणून तर ओठांवर आलं हो ना राहुल,,,,,,,
राहुल -. रियली लव्ह यू स्वीट हार्ट,,
रूपा - लव्ह यू टू राहुल,
मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल होत.
         आम्ही ठरवलं आधी शिक्षण मग वेळ दयायचा करियर कडे लक्ष द्यायचं एकत्र अभ्यास कारण आठवड्यातून एखादा तास द्यायचो एकमेकांना हेच खूप होत.
        डिग्री पूर्ण केली कॅम्पस शिलेक्शन झालं दोघांना नोकरीं लागली खूप आनंद झाला आणि आता घरात सांगायचं ठरवलं.
      मी आईला सांगितलं आई मावशीकडे घेऊन गेली राहुलचे पप्पा आधीच तिथे आले होते. आईने मावशीला सांगितलं आणि ते सगळे हसायला लागले कारण त्या दिवशी आई मला मुद्दाम घेऊन आली होती स्वयंपाक मला करायला लावला होते हे नातं त्यांनी आधीच घट्ट केलं होत.
            लग्नाचा मुहूर्त काढला जोमाने तयारीला लागले सगळ्यांच्या पसंतीने कपडे साड्या दागिने घेतले. आनंदी होते सगळे लग्न थाटात पार पडलं,,,,, पूजा झाली मालदीव ला फिरायला गेलो ते सुखद क्षण मनात साठवून माघारी आलो.
      राहुल ने जॉब सोडून बिझनेस सुरु केला स्पेअरपार्ट व इंजिन बनवण्याची कंपनी टाकली तो त्यात खूप बिझी झाला. घराकडे माझ्याकडे आई बाबांकडे त्याचं दुर्लक्ष झालं कंपनी चं काम वाढलं होत. त्यात मला दिवस गेले ही आनंदाची बातमी ऐकायला सुद्धा त्याला वेळ नव्हता मी मनातून नाराज रहात होते अशा वेळी तरी राहुल बरोबर असावा असं वाटतं होत.
         जुळी मुलं झाली एक मुलगा एक मुलगी त्याला आम्हाला भेटायला वेळ नव्हता मुलं मोठी होत होती मुलांसाठी मला घरात थांबावं लागलं होत आई बाबांना वाईट वाटतं होत पण काय कारणार कामच होत आणि आमच्यासाठी करत होता.
        पुढे पुढे हे मला असाहाय झालं मला राहुलची कमी भासू लागली मी उदास राहायला लागले त्याचा परिणाम तब्बेतीवर झाला. मी ठरवलं राहुल ला सोडायचं आणि आपण आपली मुलं घेऊन नोकरीं करून मजेत जगायचं अशातच राहुल चा आणि माझा मित्र संजू मला भेटला मी त्याला सगळं सांगितलं त्याने मला समजून सांगितलं आणि असा टोकाचा निर्णय घेऊ नको तुझ्या मनातलं त्याला सांग मग हा निर्णय घे त्याची चूक त्याला दाखवून दे पैशा पेक्षा माणूस कुटुंब महत्वाचं असतं हे पटवून दे त्याला मग त्याला कळेल ज्या कुटुंबासाठी तो पळतोय तेच बरोबर नसेलतर त्या पैशाचा उपयोग काय?
     मी विचार करत घरी आले राहुल बद्दल किंवा आमच्या दुरावलेल्या नात्या बद्दल जो गैरसमज झाला होता तो मनातून काढून टाकला व एक चिट्ठी लिहून राहुल च्या उशाशी ठेवली 
व मी झोपायला गेले.
        राहुल उशिरा घरी आला त्याने चिट्ठी वाचली डोळ्यात पाणी आलं आणि मुलांच्या बेडरूम मध्ये आला माझी माफी मागितली मुलांची आई बाबांची माफी मागितली मला तू हवी आहेस म्हणून मिठीत घेऊन रडायला लागला आणि आम्ही ठरवल एकमेकांना वेळ द्यायचा पुन्हा नातं पूर्वी सारखं घट्ट करायचं,,,,,,,
      राहुल आता घराकडे लक्ष देत होता एक दिवस मला म्हणाला रूपा, ऑफिस जॉईन करते का माझा ताण थोडा कमी होईल आणि तुलाही बर वाटेल तो दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस होता.
आज आमची हैप्पी फॅमिली उठून दिसत होती.
सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या )
नऱ्हे, पुणे      8799843148

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...