वाचिता दैनिक विदर्भ सत्यजीत
आनंदाश्रु नयनी आले
कष्टाविना फळ नाही
हे आपण सिद्ध केले
पाहता रुप आपुले
दिसे चेहऱ्यावर हास्य
कलागुणांनी संपन्न
असे कर्तृत्वाचे यश
शिक्षकी बाणा आपुला
अध्ययन अध्यापनात प्राण
ज्ञानार्जनासाठी तळमळ
साहित्याची घेतली आण
नाईट हायस्कूल अध्यापन
दिवसा असे समाजकार्य
शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्र
चौफेर करी सत्कार्य
आठवतो तो दिवस
कवितेत केले मार्गदर्शन
नाही विसरणार कधी
आहात आपण मार्गदर्शक
वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक
वाचनीय ,अर्थपूर्ण साहित्य
ज्ञानात पडे भर
वाचनाने मन उत्साहित
वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक
लिखाण करते आनंदाने
विचारांना मिळे चालना
कविता,लेख लिहिण्याने
पुरस्काराने सन्मानित
आपण नेहमीच व्हाल
हीच सदिच्छा सारस्वतांची
यशोशिखर गाठाल
सौ. रजिता रविन्द्र चव्हाण
बोरिवली मुंबई.
Comments
Post a Comment