Skip to main content

आईवडिलांचं हसू जपुयात

उतारवयात आल्यावर एका विशिष्ट काळानंतर आपले आईवडील आतून धास्तावत असतात. वाढतं वय आणि हातून सुटत जाणाऱ्या काही गोष्टी त्यांना आपण परावलंबी होत आहोत याची जाणीव करून देतात. काहींना ते सहज स्वीकारता येते तर काहींना ते प्रचंड अवघड वाटू शकते.

अशावेळी अपत्य या नात्याने आपल्याला ती फेज योग्यरीत्या समजली पाहिजे. लहानपणापासून आपण आपले हट्ट त्यांच्यावर थोपवलेले असतात, तरुणपणी आपण आपल्या सडेतोड भूमिका त्यांच्यासमोर मांडलेल्या असतात त्यामुळे आपण हक्काने आपली चिडचिड, राग त्यांच्यासमोर व्यक्त करत आलेलो असतो पण आईवडील उतारवयात आल्यावर अपत्यांनी ही भूमिका बदलायला हवी. कारण या काळात आजारपण, संथपण, असंख्य आठवणींचा भार त्यांच्या मनावर गारूड घालून असतो. आसपासची त्यांच्या वयाची त्यांना सोडून गेलेली माणसं त्यांच्या दुखाचं कारण असू शकतात, ते आपण समजलं पाहिजे. त्यात त्यांना फक्त तुमच्या विश्वासाची आणि दोन आदरयुक्त शब्दांची गरज असते. अशावेळी तुमचा आततायीपणा, राग, हट्टीपणा त्यांना डिप्रेस्ड करू शकतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर जरी आई वडिलांसमोर कोणतेही हक्क गाजवलेले असले तरी आता मात्र तुम्ही त्यांच्या या वळणावर तुमची कर्तव्ये समजून त्यांना जपलं पाहिजे. आणि ते फार सोपं असतं कारण वृद्धापकाळात आईवडिलांना जपायला पैसा नव्हे तर तुमची नियत चांगली असणे आवश्यक असते. 

त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना तुमच्याकडे संवेदनशीलता असली तरी खूप काही सोपं होतं. ज्या मायेने त्यांनी लहानपणी तुम्हाला चिऊ काऊच्या गोष्टी सांगून घास भरवलेत... या वळणावर तितक्याच मायेने तुम्हालाही त्यांना घास भरवता आले पाहिजेत. आईवडिलांसाठी थोडं आऊटडेटेड व्हायला काहीच हरकत नसते!

त्यामुळे या काळात त्यांच्याशी बोलतांना, त्यांच्यासोबत वावरतांना त्यांना कंफर्ट झोनमध्ये आणण्याबद्दल दक्ष राहणे आवश्यक आहे. तुमचा एक उंच आवाजही त्यांना धडकी भरवू शकतो... त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी थोडं बदलायला हवं. इतकंच त्यांचं हसू जपायला पुरेसं असतं.

©️ ज्योती हनुमंत भारती

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...