Skip to main content

*मनातील खदखद...*


        आपण माणूस म्हणून या भूतलावर जन्मा आलो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.हा जन्म पुन्हा नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.मृत्यू आपल्या हातात नाही,तो कधी,कसा येईल काही सांगू शकत नाही.त्याला काही कारण लागत नाही...झोपेत ही जावू शकतो? किंवा भयाण अपघात मधून सुखरूप वाचूही शकतो.म्हणून लाभलेल्या जन्मांचे सार्थक करावे असे मला तरी वाटते."*केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे.*" 
         प्रत्येक चांगल्या,अवघड गोष्टीची सुरुवात त्रासदायक असते.रूढी,परंपरा या हळू हळू बदलल्या पाहिजे,किंबुहना तो निसर्ग नियम आहे.आपली एवढी मोठी लिखित राज्यघटना वेळ प्रसंगी बदलता येतात..त्यातील कलमे काढणे किंवा नवीन कलमे त्यात मिळविणे.मग,या रूढी, परंपरा का बदलता येत नाही.स्वार्थ साधण्यासाठी बऱ्याच गोष्टी परंपरा नावाखाली केल्या जातात.विज्ञान फक्त शिकतो किंवा शिकवितो... पण,प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.जन्म,मृत्यू सजीवांची लक्षणे आहेत,ते कोणाच्या ही हातात नाही.मग,प्रत्येक जण मृत्यू पावणार आहे.हे अंतिम सत्य तर सर्वांनाच मान्य असावे.डॉक्टर तरी त्यांचा मृत्यू रोखू शकले का ? किंवा परंपरा ठरविणारे?
             स्री व पुरुष या दोनच मानवी जाती महत्त्वाच्या.इतर जाती/ धर्म स्वार्थासाठी निर्माण झालेत.प्रत्येक जाती,धर्मात काही रुढी,परंपरा यांनी थैमान घातले.पण,बदल आवश्यक आहे की नाही ? चार भिंतीत राहणारी महिला आता बाहेर पडू लागली,विचार करू लागली? खांद्याला खांदा लावून कार्य करू लागली.हे जसे हळू -हळू पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्वीकारले.ते जसे गरजेचे होते तसे अजून ही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यात बदल होणे खूप गरजेचे आहे.त्यावर फक्त चर्चा न होता अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.*"बदल हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.*" 
          "*आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे*". मला विश्वास आहे बदल हा नक्की घडेल..पण,त्याला वेळ लागेल.पण,अजून किती वेळ लागेल?... आता २०२५  साल उजाडेल तरी बऱ्याच अशा गोष्टी आहे त्या बदलण्याची गरज आहे. त्यातील ठळक काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करते...
१)अजुन ही काही मंदिरात महिलांना प्रवेश नाही.ती ही एक माणूस म्हणून तिला प्रवेश हा मिळालाच पाहिजे.
२)पूर्वी सतीची चाल होती,आता ही त्याच यातना तिला जाणून बुजून दिल्या जातात.कोणताही समारंभ असू द्या विधवा महिलेला डावलले जाते.तिला तो मान दिला जात नाही.साधे हळदी कुंकू लावणे ही टाळले जाते.या कु प्रथा कायमच्या बंद झाल्या पाहिजेत.तिला औक्षण करायला सुद्धा साधा मान दिला जात नाही.मान म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून अधिकार डावळला जातो.जाणून बुजून सौभाग्यवती महिलांनी औक्षण करावे असे सांगितले जाते.या गोष्टी शाळेमध्ये,कार्यालयात, समाजात घरोघरी घडते..जी एक समाज घडवते,ज्ञान गंगा जेथून वाहते आहे तेथे ही असे घडते. तिला कुंकू लावण्याने तिचा पती जिवंत होईल याची भीती वाटते का ?का अजुन काही? हेच समजत नाही.उलट विज्ञान सांगते दोन्ही भुवई दरम्यान सर्वांनी गंध लावावा.मग तिला का लावू दिले जात नाही हळद कुंकू.ती रूपवान दिसते म्हणून का? तिने कुरूप दिसावे म्हणून हा समाजाचा अट्टाहास.
३) पती निधनानंतर तिची इच्छा नसताना तिच्या नावाचे नामकरण विधी करायला हा समाज तयार होतो...सौ हा शब्द काढून लगेच श्रीमती ही पदवी लावून रिकामे होतात.इतर सौ.. व ती तेव्हा श्रीमती होते..किंवा तिच्या नावाच्या पुढे काहीच लिहित नाही.कशाची भीती असते त्यांना काही समजत नाही.ती पण तिच्या मुलांची आई,नवऱ्याची बायको,आई बापाची लेक,सासू सासऱ्यांची सूनच असते ना..मग हा बदल का अन् कशासाठी? सौ. हे जे तिच्या आधी लागलेले असते ते बदलून काय मोठा तिर मारतात..ही मंडळी हेच समजत नाही.
४)पती निधनानंतर ती एकटी म्हणून तिला मदत करायची देतात सोडून  तर..याच्या उलट चित्र दिसते.तिला मानसिक त्रास देवून तिचे खच्चीकरण करायचे.शारीरिक त्रास ही कित्येक ठिकाणी तिला दिला जातो.वाईट नजरेने तिच्याकडे पाहिले जाते.मदत न करता तिच्या समोर संकटांचा डोंगर उभा करायचा.कधी कधी तिची शिकार ही करायची.बराच वेळा ती बळीचा बकरा/ बकरी होते.
५)मासिक पाळी असताना महिलेला धार्मिक कार्य करण्यास,पुजा करण्यास,पुजेला बसण्यास मनाई केली जाते ती थांबली पाहिजे.तिला पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये आराम लाभावा म्हणून चार दिवस विश्रांती दिली जात होती,आता तशी आवश्यकता नाही...मग हे थांबले पाहिजे ना.यासाठी मासिक पाळी पुढे ढकलण्यात यावी म्हणून ती नको त्या गोळ्या घेवू लागली..किंवा मासिक पाळी लवकर येवुन जावी म्हणून नको ते उपाय करू लागली..स्वतः च्या शरीराचे हाल करू लागली.हे चित्र आता थांबले पाहिजे.
६)तुमच्या समोर जी व्यक्ती जिवंत आहे,तिच्या मनाचा विचार व्हायला हवा.पण,तिलाच जिवंत पणी मारले जाते .. मानसिक यातना देवून.
७) तुम्ही स्वतः अध्ययन करून ज्या उपाध्या मिळविल्या आहेत त्या तुम्ही लावाव्यात.विनाकारण कोणी ही ते कितीही मोठा व्यक्ती असू द्या,प्रशासन असूद्या त्यांना नको त्या उपाध्या देण्याचा अधिकार नाही.( म्हणजे श्रीमती/ ग.भा या ज्या पदव्या देतात त्या थांबल्या पाहिजे.माणूस असाल तर नक्की थांबवाल.)
८)स्री पुरुष समानता कृतीतून जाणवली पाहिजे. समान काम,समान वेतन.असे जेव्हा बोलतो तेव्हा स्री व पुरुष हे दोघेही समान होतात.कोणाचा कोणताही उपकार नको.प्रत्येकाला त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे..कारण त्या त्यांचे कर्तव्य पूर्ण करतात.एक आई,पत्नी,लेक,सून,बहीण,मैत्रिंम्हणून.
९)अजून ही काही गावांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलेला/ मुलीला गावाबाहेर बसवले जाते.किंवा घरात बाजूला बसवले जाते..काय तर कावळा शिवला असे म्हणतात.अहो तिला त्या वेळेत तुमच्या प्रेमाची गरज असते.कोणी तरी विचारावे..वेळ द्यावा,जवळ बसावे असे वाटते.तिच्या हातून साधे पाणी ही चालत नाही..जेवण तर कोसो दूर.समारंभ मध्ये ही तिला जाता येत नाही.देवतांची आरती ही तिला करता येत नाही.प्रसाद ही तिला दिला जात नाही.तिला त्या काळात मानसिक आधाराची गरज असते..नेमका तोच तिला तेव्हाही मिळत नाही.काय म्हणावे? पुरुषांना दाढी/ मिशा येतात तेव्हा असेच केले जाते का? थोडा विचार करा..*" जगा अन् जगू द्या*".
१०)ज्येष्ठ साहित्यिक म्हणा किंवा विचारवंत म्हणा किंवा आपले वरिष्ठ म्हणा.त्यांच्याकडून जेव्हा असे ऐकू येते की,सुवासिनी यांनी औक्षण करावे...त्या वेळी विचार येतो...नेमके कोण सुवासिनी? त्यांच्याकडे कोणती अशी पॉवर असते जी पती नसलेल्या महिलेकडे नसते.किंवा कोणता अधिक च अवयव असतो तो या महिलांना नसतो? का या कोणाच्या आई,लेक,बहिण,सून राहत नाही.
       शाळा,घर,मंदिरे या ठिकाणचे पावित्र्य आपल्या शुद्ध विचारांवर अवलंबून असते.रोज देव देव करणारे ही सतत इतरांना मानसिक त्रास देतांना पाहिले .काहींचे कान खूप हलके असतात..वजनाने नाही ओ..कोणी काही सांगितले की त्या प्रमाणे ग्रह करून घ्यायचा. खाल्या मिठाला ही लोक आजकाल जागत नाही.फक्त घेण्याची विकृती दिसते..देण्याची नियत दिसत नाही.जे पेराल ते उगवते.कोणी केलेली मदत कधीच विसरू नये.कोणाचा पैसा फुकट वापरू नका.तुम्हाला वेळेत पैसे देवून केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून ते पैसे वेळेत त्या व्यक्तीला परत करा.दानशूर लोक खूप कमी आहेत.मैत्री खातर मदत करतो...पण,जेव्हा असे कृतघ्न लोक आजू बाजूला भटकतांना दिसतात तेव्हा वाटते...रस्त्यावरची जनावरे बरी.कोणाला फसवून कोणाचे कधीच भले झाले नाही.. जरी झाले असेल ते  क्षणिक समाधान असेल..आंतरिक समाधान कधीच मिळणार नाही..कायम अपराध्याची भावना मन पोखरेल.. जर माणूस असाल तर..ते नसेल तर माझी भाषा समजणार च नाही..कारण मानव प्राणी सोडून इतर प्राण्यांना माझी भाषा कोठून समजणार.त्यांच्या लेकरांच्या तोंडचा घास जेव्हा तुम्हाला देवून मदत करत होते...ती भावना,ते उपकार,ती तुमची गरज तुम्ही डोळ्यासमोर आणावी. आणि माणूस म्हणून जगावे.केलेले उपकार स्मरून त्याची परत फेड करावी...कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा हिशोब येथेच होतो. *"माणूस म्हणून जन्मा आले,माणूस म्हणून जगेल मी*". *"भरभरून इतरांना देत रहा ..जे - जे चांगले आहे ते ते*"... *"पेराल ते उगवते*".*"शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी*".

*सौ.प्रतिमा काळे /प्रतिमा खेमनर*
 *निगडी प्राधिकरण पुणे,४४*
*मो.नं.8830654661 /9405042938*.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...