माझ्या शाळेतील ही इयत्ता नववीची मुलं आहेत....
स्थानिक पातळीवर घेतलेल्या नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयाचं बक्षीस पटावलं...
एक समाधान व आनंद आहे की या मुलांची तालीम मी मागील काही दिवसांपासून घेत होतो...
शनिवारी नाट्य सादरीकरण होतं... परंतु मी नेमका याच दिवशी लेणी अभ्यास दौऱ्यासाठी पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर येथे होतो...
मी नसतांनाही मुलांनी छान सादरीकरण केले व आज सकाळी शाळेत येताच एक आकर्षक सन्मानचिन्ह घेऊन माझ्याकडे आली व
संबंधित इतिवृतांत सांगितला...
खूप छान वाटतं आपण अशा कलाकृतीचा एक भाग असतो...
संतोष रामचंद्र जाधव
शहापूर जि.ठाणे
7507015488
Comments
Post a Comment