Skip to main content

*नववर्ष साजरे करताना*


   हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्याला सुरू होते त्यामुळे डिसेंबर नंतर येणारा जानेवारी हा महिना म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला दिवस आता त्याचा आनंद साजरा करायचा की नाही याविषयी आपल्याकडे बऱ्याच चर्चा होत असतात त्या फक्त नवीन वर्षाबद्दलच मर्यादित नसून अनेक सणावारांपासून तर अगदी वाढदिवस साजरे करायचे की नाही याबद्दल देखील कायम होत असतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की जर जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, वाढदिवस साजरा करणे ही आपली पद्धत नाही,अनेक असे सण उत्सव आहेत जी साजरे करणे आपल्या हिंदू धर्माला मान्य नाही, मग यांची सुरुवात झाली तरी कुठून, अगदी लहानपणापासून मराठी शाळेत शिक्षण घेत असताना देखील दरवर्षी Happy New year हे शब्द आमच्या कानावर टाकले कुणी,, 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी फिक्स असते,, नवीन वर्ष म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी अनेक जाहिराती लावल्या जातात डिस्काउंटच्या,, बऱ्याच वस्तूवर सूट देखील दिली जाते नवीन वर्षाच्या निमित्ताने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा न देणारे देखील या ऑफर्सची आतुरतेने वाट बघत असतात अगदी छोट्या छोट्या गल्लीपासून तर दिल्लीच्या मोठ्या मोठ्या फाइव स्टार हॉटेल पूर्णपणे बुक झालेले असतात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी,,अनेक शाळा कॉलेज यांच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सहली आयोजित केल्या जातात घरातील लहान मुलांपासून तर अगदी प्रौढ व्यक्ती पर्यंत सगळ्यांचे प्लॅनिंग ठरलेले असतात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी. पूर्वी तर फोन आणि सोशल मीडिया इतका जास्त नव्हता त्यामुळे फक्त ग्रीटिंग कार्ड्स किंवा हाताने बनवलेले सुंदर डिझाईनचे कार्ड वगैरे आम्हाला माहिती होते मात्र आता या लॅपटॉप आणि फोन च्या माध्यमाने नवीन वर्षासाठी विविध प्रकारचे मेसेजेस सहजतेने उपलब्ध असतात.फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील नवीन वर्ष साजरे करताना टाकले जाणारे मेसेजेस, नवीन वर्षाच्या प्लॅनिंग्स,सर्व सहजपणे शेअर होत असते अगदी नवीन वर्षासाठी केलेली शॉपिंग पासून तर सेलिब्रेशन पर्यंत कोणालाच कोणताच प्रश्न पडत नाही प्रश्न पडतो तो फक्त की जानेवारी महिन्याचा पहिला दिवस हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा करायचा की नाही. बऱ्याच लोकांना नैसर्गिकदृष्ट्याने पाहताना डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हणजे वृक्षांची झालेली पानगळ,, तापमानात प्रचंड प्रमाणात झालेली घट म्हणजे कडाक्याची थंडी,, अशा निरस झालेल्या वातावरणामध्ये नवीन वर्ष कसा काय येऊ शकतो..?हा देखील प्रश्न पडतो. अशा एक न अनेक प्रश्नांमध्ये परत एक प्रश्न पडतो की,, नवीन वर्ष साजरा करायचा की नाही करायचा.? तर चला आज विचार करूया थोडंसं बिनधास्त जगण्याबद्दल आपण ज्या वेळेस जगात आलो त्यावेळेस कोणतीच तारीख वर्ष आणि दिवस आपल्याला माहीत नव्हते आणि ज्या वेळेस ह्या जगातून आपण निरोप घेऊ त्या दिवशी देखील कोणती तारीख महिना आणि वर्ष असणार आहे याची थोडी देखील कल्पना आपल्याला नसते मग ह्या सर्वांमध्ये जर आनंद साजरा करण्यासाठी एखादा छोटासा क्षण जर निमित्त ठरत असेल आणि त्यामुळे जीवनात निखळ आनंद निर्माण होत असेल तर तो साजरा करताना इतके प्रश्न का,,? अनेक ठिकाणी निखळ आनंद आणि दिखावा यामध्ये फरक योग्य प्रकारे न समजल्यामुळे चुकीच्या पद्धतीने देखील हे क्षण साजरे करतात आणि त्यामुळे अनेक लोकांच्या भावना देखील दुखावल्या जातात त्यामुळे अनेक ठिकाणी वाद विवाद देखील होतात योग्य प्रकारे आनंद साजरा न केल्यामुळे नवीन वर्ष आहे म्हणून खूप महागड्या हॉटेल्स बुक करणे,, इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला परवडणार नाही इतके खर्च करणे,, म्हणजेच नवीन वर्ष साजरे करणे नव्हे. खऱ्या अर्थाने पाहायचे म्हटले तर आनंदाचा कोणताही क्षण असो तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळेपणाने साजरा करता यायला हवा. इंग्रजी नववर्ष साजरे करणे चुकीचे नाही मात्र आपण आपली संस्कृती विसरून जर यातून आनंद मिळवण्याचा किंवा नववर्ष साजरे करण्याचा निर्णय घेत असाल तर ते नक्कीच चुकीचे ठरू शकते. कारण संपूर्ण जगातील आपली हिंदू संस्कृती ही एकमेव अशी संस्कृती आहे, जिने कधीच कोणत्याही संस्कृतीचे अपमान केलेले नाही,, आपल्या हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील नववर्षाचे स्वागत म्हणजे नवीन पालवी, नवीन उत्साह आणि जीवनात येणाऱ्या वैशाख वनव्याला सामोरे जाण्याचे धाडस. अगदी त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यातून जानेवारी महिन्यात प्रवेश करताना देखील कोणताही दिखावा न करता निखळ आनंदाचा शोध घेणे जमले तर आपण हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे केल्याचे सार्थक होईल..

                            पूनम सुलाने सिंगल,महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...