Skip to main content

आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न !





मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास,संवर्धन व्हावे,विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृ‌भाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी
विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते . त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन . नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते .या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे .आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. मोहन कांबळे. प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे,यांनी भूषविले. मा . डॉ वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  मा. प्रज्ञा .देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्या सुमधूर स्वरात ईशस्तवन  सादर केले . सर्व वातावरण मंगलमय झाले .
मा. वंदना आणेकर , मुख्याध्यापिका, अभिनय वि‌द्यालय हायस्कूल, कर्वेरोड, पुणे- उपसचिव, मातृभाषा अध्यापक संस्था यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मंगला निफाडकर  सहकोषाध्यक्ष मातृभाषा अध्यापक संस्था ,पुणे यांनी, संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. मा . डॉ .मोहन कांबळे यांनी व्यक्तीमत्व विकासात नाटयवाचनाचे महत्त्व विषद केले . मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. असे अनेक उपक्रम मराठी भाषेत शालेय स्तरावर होणे आवश्यक आहे .अशा उप‌क्र‌मामधूनच भावी उत्तम  कलाकार निर्माण  होणार आहेत असे विचार त्यांनी व्यक्त केले.मा .वृषाली खिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे कार्य कसे चालते. शालेय वयापासून रोटरी क्लब‌च्या कार्याला कसे जोडून रहायचे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील उत्साहाचे त्यांनी कौतुक केले व नाटयवाचनात सहभागी  संघांना शुभेच्छा दिल्या .संस्थेचे सल्लागार मा . हेमंत कुबडे,मा. घोरपडे . यांनी शुभेच्छा संदेश पाठवले . मातृभाषा संस्थेच्या अध्यक्षा मा . स्मिता ओव्हाळ यांनी शुभेच्छा संदेशामार्फत संवाद साधला . मा. वृषाली दातार - सदस्य रोटरी क्लब, पर्वती.
मा . पुष्पलता लाड - सेवानिवृत्त शिक्षिका रेणुका स्वरूप विद्यालय, सदाशिव पेठ ,पुणे ,  मा. अमर कोटबागी - निवृत्त ऑफिसर, नाट्याविषयीची आवड जोपासणारे रोटरी क्लब सदस्य .
मा. शोभा कमलाकर निवृत्त मुख्याध्यापिका - एस.एम जोशी ,हिंदी माध्यमिक विद्यालय , पुलगेट, पुणे .यांनी परीक्षक म्हणून कामगिरी स्वीकारली .
मातृभाषा अध्यापक संस्था सचिव मा .संध्या माने , कोषाध्यक्ष निमल गीताभारती , सहकोषाध्यक्ष मा . मंगल निफाडकर , कार्याध्यक मा . शामला पंडित (दीक्षित ) , संचालिका मा . सुरेखा सोनवणे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यास विशेष सहकार्य लाभले .
 पूर्ण कार्यक्रमाचे सुसंबद्ध असे सूत्रसंचलन संस्थेच्या कार्याध्यक्षा मा . सुरेखा लेंभे यांनी केले.  सौ. शारदा पानगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...