Skip to main content

येवती येथे भोई समाज संघटनेची सभा संपन्न प्रलंबित प्रश्न व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चात्मक प्रकाश


सुनील शिरपुरे/यवतमाळ
महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेचे वतीने भोई समाजाचे प्रलंबित घरकुल, रोजगार, मासेमारी, शिक्षण, विधवा महिलांचे प्रश्न, इतर व्यवसाय, वसतिगृह तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, राळेगाव येथे भोई समाज जोडो कृती कार्यक्रम, वधुवर परिचय मेळावा घेण्याकरिता सद्गुरु संत सोनामाता मंदिर डोमाघाट येवती येथे वडकी जिल्हा परिषद गणातील भोई समाजाच्या निवडक कार्यकर्त्यांची भोई समाजाचे नेते श्री मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात सभा घेऊन वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. भोई समाजाचे प्रलंबीत प्रश्न मांडण्याकरीता कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. राळेगाव येथे भोई समाजाचा भव्य मेळावा घेण्याकरीता ठराव घेण्यात आला तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता प्रतिनिधित्व करण्याचे एकमताने ठराव करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते मा.श्री रामकृष्णजी घरडे होते. . अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सांगितले की, भोई समाज अतिशय मागास आहे. भोई समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या प्रत्येक चळवळीसोबत असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी महिला प्रतिनिधी सौ गिताताई पडाल व युवा नेता राहुल पडाल व श्री सुरेशराव दाते यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गणात सभा घेऊन प्रत्येक गावात सभा घेण्यात येणार असल्याचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेचे सूत्र संचालन लक्ष्मण बावणे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भैय्या सातघरे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...