बारामती येथील जेष्ठ कवयित्री लेखीका पुजा माळी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक डे केअर सेंटर शाळा व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केलेल्या रुपेरी काव्यहोत्र या सलग २५ तास स्वयंरचीत काव्य वाचनाचा वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहभाग झाल्याबद्दल रुपेरु काव्यहोत्र आयोजक समितिच्या प्रमुख अॅड डॉ सौ अंजली पाटील, सहसचिव श्री गोपाळ पाटील,अॅड श्री ल जि उगावकर, अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला तसेच डे केअर सेंटर शाळा आयोजित असलेल्या बालकाव्य स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील स्मरनिकेसाठी पुजा माळी यांच्या *बागेत कवितेच्या* या बालकवितेची निवड झाली आहे.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment