Skip to main content

नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा


मातृभाषा अध्यापक संस्था पुणे व रोटरी क्लब पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या महिन्यात नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .अनेक शाळांनी यात अगदी उत्स्फूर्त सहभाग दाखवला होता .  या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.ज्ञानप्रबोधिनी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.त्याचे सादरीकरण झाले.
लहान गट ,मोठा गट , वाचिक अभिनय , वैयक्तिक ,शिक्षक नाट्य संहिता लेखन , सांघिक असे सन्मान करण्यात आले . 
मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.या संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्मिता ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले.संस्थेतील पदाधिकारी मा.संध्या माने,आ.सौ. वंदना आणेकर मा.श्री. निमल गीताभारती,मा.श्रीम. निफाडकर मंगल ,मा.श्री.पढेर विकास मा.सौ.शामला पंडित ( दीक्षित ) ,मा.श्रीम.सुरेखा लेंभे,मा.श्रीम.सोनवणे सुरेखा ,मा.श्री.जगताप सुजित, मा.श्री.गायके संभाजी, मा.श्री.पिंगळे संजय,मा. श्रीम.सुरळकर सुलभा , मा. सौ. शारदा पानगे यांचे कार्यक्रम सुनियोजित पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . प्रफुल्ल मुक्कामावर यांनी सिंगापूर या देशात मराठी शिकवण्याचे अनुभव सांगितले.शालेय वयापासूनच आपल्यातील कौशल्य ओळखून स्वतःचा व्यक्तीमत्व विकास साधावा.प्रमुख पाहुणे मा . मयुरा डोळस यांनी अभिनय क्षेत्रात नेमकं काय करावं यासाठी मार्गदर्शन केले. मा .संभाजी गायके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.लेखक आणि कवी मा.प्रफुल्ल मुक्कावार .त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.मा.मयुरा डोळस या उद्योजिका , लेखिका, दिग्दर्शिका यांचे मार्गदर्शन लाभले  नवीन काही तरी शिकत राहिले पाहिजे.हे आजच्या काळाची गरज आहे.. कृत्रिम बुद्धिमत्तेचा या काळात अनेक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.डी इकॉनॉमी समजून घ्या ,त्याचा भाग बना.एकाच आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत.स्वतःची आवड ओळखा. मा .सुरेखा लेंभे यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रमाचे आभार मा . संजय पिंगळे यांनी मानले  .

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...