Skip to main content

भिडेवाड्यात हो वाड्यात । मुलींची पहिली शाळा । कसा फुलविला । शिक्षणाचा मळा॥

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये, कवी मनोहर पवारांचा काव्य जागर .

केळवद जि बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ग्रामिण  कवी, साहित्यिक, मनोहर पवार यांनीआंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे येथे काव्य संमेलनात बुलढाणा जिल्हयातून सहभाग नोंदविला . यात सावित्रीमाई फुले जन्मऊत्सवा निमित्ताने जागतिक पातळीचे ६०० कवींनी सहभाग नोंदविलात्यामध्ये, दुबई, केरळ, आध्र, तामिळ, दिल्ली, आणि विविध राज्यातून मराठी आणि सत्यशोधक फुले प्रेमींनी सहभाग नोंदविला .

या अभूतपूर्व महासंमेलनाचे आयोजक भिडेवाडा कार, विजय वडवेराव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले . त्यात सावित्रीमाई फुले फातीमा बी,तसेच लहूजी साळवे, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर संघर्षावर आधारीत नाट्य, एकपात्री, अभिनय, काव्य वाचन, तसेच, गझल, पोवाडे, कट्टा दांडपट्टा, जुदो कराटे, आदी कलांचे प्रात्याक्षिक करण्यात आले . सहभोजन, आणि  स्नेहमिलन कार्यकम झाला . ८० वर्षांच्या वयस्कर आजीपासून ते १५ वर्षांच्या मुली पर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला . सर्वांना भारताचे संविधान व स्मृती चिन्ह तसेच आकर्षक समान चिन्ह प्रदान करण्यात आले .एस. ए म. जोशी सभागृहात ( पूणे ) रंगलेले हे फुले फेस्टिवल जागतिक उंचीचे ठरले . कारण सतत पाच दिवस अखंड काव्य ज्योत पेटलेले हे देशातील पहिले संमेलन  नोंद झाली . सावित्रीच्या वेषात सभागृह भरून उरले . क्रांती ज्योत पेटविणारे भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी स्वयंस्फूर्तीने व्यक्तीगत खर्चाने कुठलेही प्रवेश शुल्क न घेता कार्यक्रम आयोजित करीत जागतिक विक्रमच केला . याच कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील कवी मनोहर पवार यांनी सावित्री माय वर सुंदर,  भिडे वाडयात वाडयात । पहिली मुलींची शाळा ।
कसा फुलविला ।
शिक्षणाचा मळा॥ ही अत्यंत प्रभावी सुंदर
रचना सादर करून क्रांती जागर केला . दाद मिळवली . या आंतराष्टीय काव्य संमेलनात मला रुहभागी होता आले हे मी माझे भाग्य व बहुमान समजतो असे सांगीतले . कवी शाहीर, मनोहर पवार हे सातत्याने काव्य लेखन करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर काव्य वाचन करणारे बहुचर्चित कवी ठरले आहेत . त्यांच्या बरोबर कवी संजय हिवाळे, अशोक मोहीते, डॉ. मंजुराजे जाधव, पंढरीनाथ शेळके, तसेच निवृती जाधव, अनिल नाटेकर येळगांवकर, सौ सुवर्णा पवार, इत्यादींनी निमंत्रीत कवी म्हणून सहभाग नोंदविला .

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...