भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
प्रयागराज येथील कुंभमेळा मधील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलं साधुबाबा क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात,अशी खंत पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी व्यक्त केली आहे.नागबाबा, अघोरी बाबा, लांब केस वाला बाबा, लांब दाढी वाढलेला बाबा, डमरू वाजविणारा साधु वैगरे वैगरे साधुबाबा पाहयला मिळतात,पण यांना सामान्य माणसाने किंवा पत्रकाराने काही प्रश्न विचारले तर लगेच क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात.खर तर साधुबाबा म्हणजे शांत,सरळ, तपाला, ध्यानस्थ बसलेले साधुबाबा असतात असा समज असतो,पण कुंभमेळा मधील साधुबाबा लवकरच क्रोधित होऊन शिव्या देत मारहाण करताना आपण सर्व जण प्रसार माध्यमांतून पाहतो,हे असे वागणे साधुबाबांना शोभत नाही,हे पाहताना खूपच वाईट वाटते,आपले आपले वेगळेपण दाखविण्यासाठी कुंभमेळा मधील साधुबाबा वेगवेगळ किळसवाणी प्रयोग करताना दिसतात.कुंभ मेळा तील साधुबाबांचे हे वागणे प्रसार माध्यमा व्दारा पाहताना खूप वाईट वाटते, मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment