Skip to main content

ठाणे येथे राजेश साबळे, ओतूरकर लिखित "सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह? पुस्तकांचे प्रकाशन…

ठाणे-५ जानेवारी २०२५ नववर्षाच्या सुरुवातीलाच वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आणि नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतुरकर यांच्या ‘सुसंवाद आणि प्रश्नचिन्ह’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि व्याख्याते डॉ.सुनील कर्वे यांच्या उपस्थितीत आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथनगर, तीन हात नाका, ठाणे येथे, संपन्न झाले.
 याप्रसंगी पाहुणे म्हणून मा.श्री. मोरेश्वर बागडे माजी वित्त आणि विधी अधिकारी महाराष्ट्र राज्य, मा.प्रा.सुरेश डुंबरे आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि कवी, नीलपुष्पचे जेष्ठ साहित्यिक मा. नरेश पाटील मा. प्रा. मीनाताई कुलकर्णी सुसंवाद लेखिका, सोबत नीलपुष्प सदस्य  रसिक पाहुणे मंडळी, तसेच साबळे सरांचा परिवार, नातेवाईक मित्र मंडळीआवर्जून उपस्थित होते.  
सुरुवातीला सर्व उपस्थित पाहुण्यांचे औक्षण करून झाल्यावर मान्यवरांच्या शुभहस्ते गणेशपूजन आणि सरस्वती पूजन झाले. नंतर नीलमपुष्पच्या ज्येष्ठ कवयित्री सौ शशिकला कुंभार यांनी आपल्या सुमधुर आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीत सुंदर सादर केले. त्यानंतर राजेश साबळे ओतुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि सभागृहातील रसिक प्रेक्षकांचे कवी, कवयित्री, लेखक, साहित्यिक, पाहुणे यांचे मनापासून स्वागत केले. आणि नीलपुष्प साहित्य मंडळाचे साहित्यिक रुपी  रोपट म्हणून जोपासना केली. ते ठाणे आणि ओतूर भूषण स्व.डॉ.नारायण तांबे यांचे कार्य पुढे नेत असताना याच साहित्यरुपी रोपट्याला कथा, कवितांचे साहित्यरुपी खत, पाणी घालून साहित्याची सेवा. सर्व साहित्यिक सहकाऱ्यांच्या मदतीने अविरत सुरु ठेवली त्या नीलापुष्परुपी साहित्यिक कल्पवृक्षाची जोपासना करण्याचे काम आम्ही सर्व साहित्यिक मंडळी करीत आहोत. आणि त्यातूनच आज हा साहित्याचा डॉलर मोठा होत आहे. डॉ नारायण तंबेयानी आमच्या रुजविलेली साहित्यरुपी बाग फुलविण्याचे काम आम्ही करीत आहोत. या बागेला अनेक कवी, कवयित्री, साहित्यिक यांच्या विचारांचे खतपाणी घालून हा नीलपुष्पचा वटवृक्ष अधिक मोठा करण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्यातूनच अनेक कवी, लेखक, साहित्यिक निर्माण होत आहेत. त्यापैकीच मी एक... 
आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत माझ्या ‘सुसंवाद आणि प्रश्नचिन्ह?’ या पुस्तकाचे प्रकाशन मा.डॉ सुनील कर्वे मा,मोरेश्वर बागडे, वित्त आणि लेखा अधिकारी महाराष्ट्र राज्य, प्रा.सुरेश डुंबरे आंतरराष्ट्रीय चित्रकार, सुविचार लेखिक ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मीनाताई कुलकर्णी, कवी लेखक मा.नरेश पाटील आणि सभागृहात उपस्थित असलेले आपण सर्व कवी, साहित्यिक, लेखक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातले रसिक प्रेक्षक, पाहुणे मंडळी आणि माझे सर्व नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा होतो आहे याचा मला खूप आनंद आहे.
जागतिक महामारीच्या कोरोना काळात माणसं वैफल्यग्रस्त स्थितीत असताना डॉ. नारायण तांबे यांनी "चला आयुष्य बनवूया सुगंधी" ही विचारधारा आम्हा साहित्यिकांमध्ये रुजवण्याचं काम सुरु केले. आणि जी माणसं दुःखी, कष्टी आहेत, मनातून घाबरली आहेत.  घरात बसून असल्याने सैरभैर झाली आहेत. त्यांना आनंद ठेवण्याच्या निमित्ताने या उपक्रमाची निर्मिती झाली. आणि त्या अनुषंगाने रोज प्रत्येकाने नवीन काहीतरी लिहून समाजाला आनंद ठेवण्याचे काम करावे अशी ही योजना तयार केली.  आणि ह्या योजनेअंतर्गतच अनेक कथा, कविता, लेखक कवी साहित्यिक लिहिते झाले. त्यासोबतच रोज सकाळी एक सुंदर सुविचार लेखिका मीनाताई कुलकर्णी यांनी लिहिण्यास सुरुवात केली. आणि त्या सुविचारांना अभिप्राय देताना. मी स्वतः  यावर ‘माझे दोन शब्द’ ही उपक्रमाची मालिका सुरू केली. त्यातूनच या ‘सु-संवाद’ पुस्तकाची निर्मिती झाली. 
या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक ओतूरचे सुप्रसिध्द कवी, लेखक डॉ.प्रवीण डुंबरे यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. सुंदर मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक म्हणजे एक सुंदर विचारांची देणगी आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. 
यासोबतच प्रश्नचिन्ह? पुस्तकावर बोलताना राजेश  साबळे ओतुरकर म्हणाले.. 
माणसे स्वतःचे प्रश्न स्वतःच निर्माण करतात. आणि दुसऱ्याला अडचणीत आणतात. आणि कशी आपल्या सोबत इतरना अडचणीत आणतात. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. प्रश्नाशिवाय सुसंवाद नाही आणि सुसंवाद झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. निर्माण झालेले प्रश्न चांगला सुसंवाद झाल्याशिवाय सुटत नाही. अशी दोन्हीही सुसंवाद आणि प्रश्न यावर आधारित असलेली पुस्तके आपल्या समोर घेवून आलो आहे. आपण ती वाचावीत आणि त्यावर सुंदर अभिप्राय देऊन आपले मनोगत व्यक्त करावे. हीच मनापासून सदिच्छा!!!
या दोन्ही पुस्तकावर राजेश साबळे,ओतूरकर यांच्या मुलींनी पुस्तकातील गाभा आणि त्याचे सार सांगितले. लिखित साहित्याचे खूप सुंदर अवलोकन करून त्यावर अभिप्राय सादर केला. त्यामध्ये सौ. नीलम भोसले आणि सौ लीना बाबर यांनी अभ्यासपूर्ण आपले मनोगत व्यक्त केले. 
यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रा. सुरेश डुंबरे यांनी माझ्या बंधूंचा चित्रकला शिक्षकाचा साहित्यिक प्रवास याबद्दल सुंदर मनोगत सादर केले. 
सुप्रसिद्ध निवेदक, कवी, लेखक संजय गवांदे यांनी राजेश साबळे  ओतुरकर यांच्या मुलींनी केलेल्या मनोगतावर सुंदर भाष्य केले. ज्यांच्या घरातच साहित्यिकांच्या रोपट्याची जोपासना होते आहे.  ज्यांनी आपल्या स्वतःच्या घरापासून साहित्य सेवेला सुरुवात केली आहे. आणि तेच साहित्य ठेवा त्याच पद्धतीने हे समाजातही रुजवण्याचे काम या नीलपुष्प साहित्यिक मंडळाच्या सोबतीने करत आहेत. हे अतिशय उल्लेखनीय काम आहे. दुसऱ्याला सांगणं वेगळं परंतु स्वतःच्या घरातील मुला-मुलींना साहित्यात उतरवून मराठी भाषेची सेवा करायला प्रवृत्त करणे ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आज पाहायला मिळाली. आपल्या वडिलांच्या पुस्तकावर इतकं सुंदर पद्धतीने विवेचन करणाऱ्या  दोन्ही मुली. नीलम आणि लीना ही त्यांची दोन अपत्य आणि आज या ठिकाणी दोन पुस्तकांचे प्रकाशन हा सुंदर योगा योगायोग म्हणावा का? असा प्रश्न पडावा आणि म्हणूनच सुसंवाद आणि प्रश्नचिन्ह? या पुस्तकाचे वाचन केल्याशिवाय त्याची उत्तर काय याचे सुसंवाद हे उत्तर आहे हे कळणार नाही. 
सुविचार लेखिका प्रा. मीनाताई कुलकर्णी यांनी कोरोना काळात डॉ. नारायण तांबे आणि राजेश साबळे, ओतूरकर यांनी ‘चला आयुष्य बनवूया सुगंधी’ या कार्यक्रमाच्याद्वारे नीलपुष्पच्या साहित्यिकांना मनोगते व्यक्त करण्याची  सुवर्ण संधी दिली. आणि त्यातून अनेक नावांत कवी, लेखक, निर्माण झाले. त्यातली मी एक....  
माझ्या सुविचारावर राजेश साबळे यांनी अतिशय सुंदर ‘दोन शब्द’ असे सदर चालवून त्यातून जवळजवळ ५० ते ६० ऑडिओ निर्माण केले आणि पुढे वर्षा दोन वर्षातच या सुविचारावर संवाद नावाचे पुस्तक स्वतः लिहिले आणि आज त्याचे प्रकाशन होत आहे. आणि त्यासोबतच प्रश्नचिन्ह? या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. कारण मी या पुस्तकाचा एक भाग आहे. आणि माझे विचार साबळे सरांनी इतक्या सुंदर पद्धतीने या पुस्तकात मांडले याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते..

ज्येष्ठ साहित्यिक मा. नरेश पाटील आपल्या मनोगतात म्हणतात अनेकांचे प्रश्न सोडविणारे आमचे राजेश साबळे, ओतूरकर यांना प्रश्नचिन्ह? हे पुस्तक का लिहावे वाटले असेल आणि त्याचे उत्तर ही त्यांनीच सु-संवाद या पुस्तकातून दिले.साहित्यिक कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी वित्त आणि लेखा अधिकारी मा. मोरेश्वर बागडे सर यांनी ‘सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह?’ या पुस्तकाचे एकूण निर्मिती आणि यामध्ये त्यांनी मांडलेले विचार याची तुलनात्मक बांधणी करून आपले विचार व्यक्त केले. साहित्य सकस कसे निर्माण होतं याबद्दल बोलताना मोरेश्वर बागडे म्हणाले....
‘जीवनात जे सोसलेले आणि अनुभवले आहे. त्यासोबत आजूबाजूचा परिसर याचे निरीक्षण करून समाजात घडत असलेलेया घटनांचे पडसाद त्यावर आपले भाष्य सुंदर पद्धतीने समाजासमोर ठेवणे.. म्हणजेच सु-संवाद आणि त्याच्या सोबतीला पुन्हा प्रश्नचिन्ह?  हा एक सुंदर मेळ राजेश साबळे, ओतूरकर यांनी आपल्या पुस्तकातून घातलेला आहे. अडचणी तर सर्वांनाच असतात. पण त्या हसत हसत पेलण्याचे सामर्थ्य माणसात कसं असलं पाहिजे, याची सुंदर उदाहरण त्यांनी हा पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवले आहे. त्यांनी  या पुस्तकात देवालाही प्रश्न विचारला आहे याचं उदाहरण देताना इरसाळवाडीच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कविता शेवटच्या पानावर टाकून पुस्तकाचे शेवट केला आहे. ही दोन्ही पुस्तकं अतिशय सुंदर असून आपण ती जरूर वाचावीत असं त्यांनी अशी वाचकांना आवाहन केले. 
पुस्तके तुम्हाला एखाद्या बायबलसारखी किंवा गीतेसारखे उपयोगी पडतील. वाचा आणि त्यातून स्फूर्ती घेऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकता. डॉ सुनील कर्वे  यांचे सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह? या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलताना  प्रतिपादन... 
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षणतज्ञ आणि व्याख्याते डॉ. सुनील कर्वे म्हणतात.. मी काही कवी, लेखक आणि साहित्यिक ही नाही. तरी या राजेश साबळे सरांनी मला त्यांच्या सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह? या पुस्तकाच्या प्रकाशासाठी अध्यक्ष म्हणून का बोलावले असेल? असा त्यावेळी मलाच प्रश्न पडला. आणि मी विचार करू लागलो. तो आता पर्यंत..
एकाच वेळी दोन भिन्न प्रकारची पुस्तके प्रकाशित करण्याचा योग मला आणि माझ्यासोबतच्या पाहुणे मंडळींना आला. हे मी माझे भाग्य समजतो. एक मुंबई मनपा शिक्षण विभागातील सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक म्हणून सुरु केलेला प्रवास. हा माणूस आपल्या सेवानिर्मितीनंतर.. साहित्यिक सेवर रममाण होतो. आणि  दुखी कष्टी माणसांची मने विकसित करून डॉ. नारायण तांबे यांचे उधुरा राहिलेले काम साहित्यरुपी मळा फुलवून त्याचा वटवृक्ष कसा होईल. आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये साहित्यिकांना आपले साहित्यनिर्मिती करताना आनंद कसा मिळेल रममान आहे. म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या साहित्यिक सोबतींबरोबर काही वेळ घालवावा या हेतूने आज मी या ठिकाणी आलो आहे. 
यासोबतच डॉ. नारायण तांबे यांच्यामुळे मी नीलपुष्प साहित्याचा रसिका कसा झाला याचेही सुंदर उदाहरण त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आणि साबळे सरांनी मला पुस्तकाचा प्रकाशनासाठी काय निमंत्रित केले त्या दिवसापासून मला पडलेले प्रश्नचिन्ह? ते आत्तापर्यंत आहे. 
त्यांचा या कामासाठी फोन आल्यावर मी त्यांना म्हटलं की पाच मिनिटात डायरी बघून तुम्हाला फोन करतो. आणि मी दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना फोन केला मी येतो. तर त्याचे कारण असं होते की मी उशीर केला आणि त्यांनी दुसरा कोणी पाहुणा निवडला तर? कारण या निमित्ताने तुम्हाला भेटता येईल. तुमच्याबरोबर एक चांगला अनुभव घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून म्हटलं की, मी कुठलाही साहित्यिक किंवा एखाद्या मंडळाचा अध्यक्ष नाही म्हणून म्हटलं.. 
साबळे सरांची ‘सुसंवाद आणि प्रश्नचिन्ह?’ ही जी दोन पुस्तक आहेत. यावरून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. मी त्यावेळी मॉ शाळेत  मॉनिटर होते. आपल्याला वाटले असेल की, मी हुशार असेल म्हणून शाळेत मॉनिटर आहे. पण तसं नाही तर, माझ्या उंचीमुळे मला मॉनिटर करण्यात आली होते. कारण शाळेच्या बोर्डवर लिहिण्यासाठी उंच माणसाची आवश्यकता असते. ती आज शाळेत किती मुलं उपस्थित आहेत. आणि त्याखाली एक सुविचार..हे लिहिण्याचे काम माझे होते. पण त्या काळामध्ये मी लिहिलेले सुविचार कोणी वाचले असतील असे मला वाटत नाही. पण जसजसा मी मोठा झालो. आणि अनेक पदावर काम केली. जगभर प्रवास केला. पण सुविचारावर पुस्तक लिहिणारा हा पहिला माणूस मी साबळे सरांच्या रूपाने पाहिला. ‘ही कल्पनाच लय भारी आहे.’ असं ते म्हणाले.
कारण असं की या सुविचाराला लोक तसं पाहिलं तर काहीच किंमत देत नाहीत. त्याच सुविचारावर यांनी पुस्तक लिहावं. यावरून त्यांनी सुविचाराला किती मोठी उंची आणि त्याची पातळी वाढवली आहे. हे आपल्या लक्षात येईल. खरं सांगायचं म्हणजे साबळे सरच हे करू शकतात. ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे.
मी शाळेत तसा वात्रटही होतो अनेक वेळेला सुविचार लिहिताना मी, एका कानाने ऐकावे आणि त्या कानाने सोडून द्यावे असेही लिहीत असे. आणि त्याखाली ऐकावे जास्त आणि बोलावे कमी असेही लिहीउत होतो. कारण तसा मी वर्गातला वात्रट विद्यार्थी. पण आज या नीलपुष्प साहित्य मंडळाच्या कार्यक्रमात मी आलो. मला आपल्याला भेटता आलं. या अगोदरच्या काळात मी चार वेळा या नीलपुष्प मंडळाचा सदस्य झालो. आणि पुन्हा त्यातून बाहेर पडलो. पण तांबे सरांनी पाचव्या वेळेला सांगितले आता जर का तुम्ही या नीलपुष्प मधून बाहेर पडला तर, मी तुमच्या घरी राहायला येईन. आणि त्यानंतर मी या ग्रुप मधून आज पर्यंत बाहेर पडलो नाही मला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही हे माझं खरं दुःख आहे. परंतु वेळ मिळेल तेव्हा मी नीलपुष्पच्या  व्हाट्सअप ग्रुप वर येतो आणि माझ्या मनातील काही विचार या समूहावर सादर करतो. तेव्हा हेच साबळे सर मी मांडलेला विचार यावर लगेच आपलं मत नोंदवतात. हे विशेष आहे. हे फक्त माझ्यासाठीच करतात असं नाही. तर त्यांच्या समूहात असलेले जेवढे नीलपुष्पचे सभासद आहेत. त्या प्रत्येकाच्या लेखणीचा आस्वाद घेऊन यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. हे त्यांचे मोठेपण या नीलपुष्परूपी समूहाला बांधून ठेवण्यासाठी आणि साहित्यसेवा अखंडित करण्याचा चाललेला प्रयत्न आहे.तसं पाहिलं तर या समूहात मी श्रेष्ठ ही नाही आणि ज्येष्ठही नाही. 
मी कार्यक्रमाला आलो तेव्हा गेटवरच मला कळले की साबळे सरांच्या प्रश्नचिन्ह? आणि सुसंवाद या पुस्तकांची व्यपती काय आहे. आणि उंची काय आहे. त्याचे असे झाले की, मी गेटवर गाडी पार्क करत होतो. आणि सिक्युरिटी धावत आला. आणि त्याच्याशी पहिला सु-संवाद करण्याचा योग आला, मी म्हणालो साहेब गाडी इथ लावली तर चालेल काय? तर त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणाला... साहेब चालेल काय धावेल...आणि हा पहिला सु-संवाद कार्यक्रमाच्या गेटवरच घडला. मी जर कोणी मोठा माणूस आहे. असं त्याला सांगत बसलो असतो तर, सु-संवाद झाला असता काय? म्हणजेच काय प्रश्न पडतात. आणि ते सोडवतोही आपणच. पदोपदी आपल्याला प्रश्न पडतात. हे प्रश्न त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये येथे बंद करून ठेवलेले आहेत. हा पुस्तकरुपी ठेवा आपल्यासमोर त्यांनी ठेवला आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला मार्गदर्शन लागेल, तेव्हा तेव्हा हा पुस्तकरुपी ठेवा आपण वाचावा. ही पुस्तके तुम्हाला एखाद्या बायबलसारखी किंवा गीतेसारखे उपयोगी पडतील वाचा आणि त्यातून स्फूर्ती घेऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकता.
त्यातून तुम्ही संवाद करा आणि त्यातूनही नाही सुटला तर सु-संवाद करा म्हणजे जे काही आपण म्हणतो साम दाम दंड भेद बाजूला राहील संवादातून प्रश्न सुटतील. त्यांनी या दोन्ही पुस्तकातून अतिशय सुंदर सुसंवाद साधलेला आहे. 
मला असं आठवतं की लहानपणी नवनीत म्हणून एक पुस्तक बाजारात येत होते नवनीत प्रकाशनचे.... आपण सर्व शिक्षक आहात मी शिक्षक आहे. नवनीतमध्ये असं होतं की, प्रश्न द्यायचा आणि त्याच्याखाली उत्तर.. तशीही प्रश्न उत्तर आहेत. आणि म्हणून मला नवनीत गाईड आठवलं. हे एक प्रकारचं गाईडच आहे. ते साबळे सरांनी आपल्यासमोर ठेवला आहे. आणि त्याच्यामध्येच समाजाला पडलेले प्रश्न-उत्तर या पुस्तकात आपल्याला सापडतील. या पुस्तकातील विचार त्याचे मुखपृष्ठ त्याचं बाईंडिंग अतिशय सुंदर आहे. त्यात खूप सुबकपणा आहे. त्यामुळे मला पडलेले अनेक प्रश्न या पुस्तकामुळे सुटलेले आहेत. कारण याची प्रत त्यांनी मला अगोदरच पीडीएफ  पाठवली होती. तर बघा प्रश्नचिन्ह? या पुस्तकावर जे कव्हर पेज आहे त्यावरील चित्र मी आत्ता बघितलं आणि आता या ठिकाणी जो वावरतो आहे तो साबळे सरांचा मुलगा आहे. तोच या पुस्तकाच्या कव्हरवर आहे. आणि दुसरे पुस्तक आहे. सु-संवाद त्यावर त्यांच्या नातवाचे चित्र आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झालं की, संवाद केल्याशिवाय सुटत नाही. त्यामुळे हा जबरदस्त फॉर्मुला मी आज या कार्यक्रमाच्या रूपानं सोबत घेऊन जाणार आहे. आणि हेच माझे बक्षीस आणि ठेव आहे. असे मी समजतो. कारण या समूहमध्ये एवढे दिग्गज आणि नामावंत कवी लेखक आहेत. त्याचं नोटिफिकेशन सुद्धा साबळे सर आपल्या रोजच्या अभिप्राय मधून करीत असतात. याला आम्ही इंग्लिश मध्ये एक्लाजमेंट असे म्हणतो. साबळे सर म्हणजे साहित्य समूहाच्या अध्यक्ष पदापेक्षाही जास्त काम करणारा एक वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. त्यांना हा सगळा वेळ कसा मिळतो. हे ईश्वरच जाणे. त्यांच्याकडून अशा प्रकारचं अधिक साहित्य निर्माण होऊन मराठीची सेवा करण्याची बळ मिळो ही या नववर्षानिमित्ताने माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत.
या नंतर नीलपुष्प काव्यसंध्या सुरु झाली विषय होता. प्रेम, देशभक्ती आणि मकरसंक्रांत या काव्यसंध्येत अध्यक्ष डॉ सुनील कर्वे, पाहुणे मोरेश्वर बागडे, मीनाताई कुलकर्णी, ज्येष्ठ कवी नरेश पाटील, शाहीर किरण सोनावणे,अभिमन्यू शिरसाठ, शशिकला कुंभार, डॉ अनुपमा पाटील, सुमन बनकर, मकरंद वांगणेकर, कमलाकर राऊत, लक्ष्मण माळी, डॉ संभाजी गेजगे, आनंद  रांजणे राजन, सुनिता भालेराव, शामला  वाईकर, सावित्री झांबरे , कवी परशुराम नेहे, शैला गिरनारकर, सुभाष जैन, शिवदास व्हावळ, कमल अस्वले, ज्येष्ठ  कवयित्री लीला गाजरे, विश्वास पटवर्धन  अनुराधा पाटील. इत्यादी मान्यवर कवींनी कविता सादर सुंदर केल्या  या दोन्ही कार्य्केमाचे च्या चित्रण आणि फोटो श्री महेश साबळे, पत्रकार श्री. सुभाष जैन आणि सौ. सावित्री झांबरे यांनी केले तसेच दोन्ही कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ नीलम शेलटे खूप सुंदर यांनी केले, सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. चहा नाश्त्याची चांगली मेजवानी देवून झाल्यावर. याच कार्यक्रमात प्रा. सुरेश डुंबरे आणि कवी संजय गवांदे यांचा ७५ वा प्रजासत्ताक अमृतमहोत्सवमधील राहिलेला गौरव पुरस्कार अध्यक्ष डॉ. सुनील कर्वे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा नागेश हुलवळे सर, प्रा. सुरेश डुंबरे सर सौ सावित्री ताई झांबरे, श्री.तानाजीराव झांबरेसर, श्री. महेश साबळे, सौ. शशिकला ताई कुंभार यांचे विशेष आभार!! आणि कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची गोड कामगिरी प्रा. नागेश हुलवळे यांनी केले. यानंतर राष्ट्रगीत होवून या सुंदर सोहळ्याची सांगता झाली.
....................................

शब्दांकन 
राजेश साबळे, ओतूरकर

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...