बल्लारपूर : पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडिया मुंबई शाखा बल्लारपूर तर्फे दिनांक 7 जानेवारीला सकाळी 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार व माजी नप उपाध्यक्ष सिक्की यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तसेच विसापूर येथील वृद्धाश्रम येथे वृद्धांना भोजनदान करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष शंकर महाकाली , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली व मराठी पत्रकार संघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष रमेश निषाद यांचे प्रमुख उपस्थितीत भोजनदान कार्यक्रम पार पडला यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे पत्रकार तालुका संगठक विकास दुपारे,सचिव प्रेम गहलोत ,उपाध्यक्ष ताहीर शेख , व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य चेतन गेडाम, डॉ.राकेश कांबळे,राजेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ता नहीम भाई, नंदू तीलोकानी, माजी नगसेवक विनोद आत्रम,रोहन कळसकर,शांतिकुमार गिरमिल्ला, संतोष बरसागडे, तसेच सामाजिक उपस्थित होते।
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment