Skip to main content

*निस्वार्थी लढायाचं यशस्वी होतात ....*


    *शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध,जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही*,हे प्रसिद्ध वाक्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी यांचे आहे.ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले ते नक्कीच चांगला बदल घडवितात.अन्यायाविरुद्ध पेटून उठतात,ते पण निस्वार्थीपणे.कधीच स्वतःचा उदो उदो घडावा असा त्यांचा हेतू नसतो.आपल्या इतिहासात भरपूर व्यक्तिमत्त्व घडून गेले,ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि त्यामुळेच दूरदृष्टीने कार्य त्यांनी त्याही काळात केले.*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* यांची यावर्षी आपण *त्रिशताब्दी जयंती* साजरी करतो.त्यांना त्या काळात त्यांच्या वडिलांनी व सासऱ्यांनी शिकविले.. त्यामुळेच तर त्या वैचारिक दृष्ट्या सक्षम झाल्या आणि राज्यकारभार सांभाळू शकल्यात ते ही माणुसकीने,निस्वार्थी भावनेने कार्य केले..कोणताही जातीभेद,स्री-पुरुष,गरीब-श्रीमंत असा भेद न करता त्यांनी सामाजिक कार्य केले ते ही स्वतः च्या मालकीच्या( खाजगी) पैशातून....राज्यकारभाराचा( सरकारी तिजोरीतील) कोणताही पैसा या कामी त्यांनी खर्च केला नाही.
       त्यांच्या आधीही भरपूर महिला शिक्षित होत्या.त्यांच्यानंतर ही भरपूर महिलांनी शिक्षण घेतले.पण,आपल्या *भारतात मुलींसाठी पहिली शाळा उघडण्याचे महान कार्य माय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती ज्योतिबा फुले यांनी फातिमा शेख,उस्मानभाई शेख व तात्याराव भिडे* यांच्या सहकार्याने केले.समाजाचा प्रचंड विरोध झिटकारून,घराबाहेर राहून त्यांना हे कार्य करावे लागले.पण,आपले कार्य मागे नाही घेतले.मुलींची पहिली शाळा पुण्यातील बुधवार पेठेत तात्याराव भिडे यांच्या वाड्यात अखेर सुरू झाली.
       महिलांच्या पहिल्या शाळेचा साक्षीदार असलेला भिडेवाडा दुर्लक्षिला त्यामुळे पाडला गेला.आपल्याकडे व्यक्तीने केलेल्या कार्याची दखल ही ते जिवंत आहे तोपर्यंत घेतली जात नाही.पण,त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कार्याला वाचा फुटते....ही शोकांतिका कधी मिटणार.सर्व अनिष्ट बंधने मिटणार कधी तर सारे एक झाले तर ना.अजूनही आपण एक नाही.हा भिडेवाडा पुन्हा नव्या उमेदीने उभा राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.हा जागर निरंतर चालू राहिला तर नक्कीच प्रयत्नांना यश येणार.फक्त कोणीही त्याला जातीचे,नावाचे लेबल लावू नये.झेंड्याच्या रंगात,जातीधर्माच्या,व्यक्तींच्या नावात हे वाटले जावू नये हे महत्त्वाचे आहे.याचा विचार करून प्रत्येकाने कार्य करावे.समाजहिताचे कार्य हे कोणा एकट्याचे कार्य कधीच नसते.एकटाच व्यक्ती बसला कविता म्हणत,भाषण करत,मोर्चे काढत,घोषणाबाजी करत,उपोषणाला बसत,गावोगाव हिंडत....त्याने कधीच कोणते कार्य झालेले नाही..किंवा होणार ही नाही.जेव्हा सर्वजण मिळून चांगल्या कार्याला हातभार लावतील, जागर करतील तेव्हा नक्कीच हे कार्य तडीस जाईल.शासन दरबारी ही आश्वासन दिलेले आहे..लवकरच राष्ट्रीय स्मारक उभारेल....भूमिपूजन ही झाले..पण,प्रत्यक्ष कधी कार्य सुरू होईल..आणि आपणा समोर कधी हे राष्ट्रीय स्मारक उभे राहणार,हे अधिक महत्त्वाचे आहे.त्याचा सारखा पाठपुरावा केला नाही तर ते कार्य अजून मागे राहील.यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
      आपल्या काव्यातून,आपल्या लिखाणातून,आपल्या भाषणातून,आपल्या कार्यातून हे कार्य सतत करणे जरुरी आहे.या विशाल व्यक्तिमत्वाचे विचार आपल्या वर्तनातून,आपल्या बोलण्यातून,आपल्या कार्यातून दिसले पाहिजे.त्यांची वेशभूषा करून किंवा त्यांचे नावे धारण करून,किंवा त्यांच्या घोषणा देवून ते कधीच आपल्यात उतरणार नाही.आपले विचार विशाल असावे,निर्मळ असावे,शुद्ध असावे,त्यात कोणताही स्वार्थ नसावा,निरपेक्षवादी असावे.स्वतःच्या नावाची हवा न करता,प्रत्येकाला योग्य तो सन्मान देवून तो करावा.कोणाचाही चुकूनही आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.*कटू शब्द खूप वेदना देतात*,हे सर्वांनी अनुभवलेले असते..एक वेळेस खाल्लेला मार माणूस रडून रडून विसरून जातो..पण,शब्दाने केलेला अपमान विसरणे अशक्य.म्हणून,जीभ कधीच मोकाट सुटू द्यायची नाही...तिच्यावर कायम साखर ठेवून गोड ठेवायची..डोक्यावर बर्फ ठेवून कार्य करायचे.प्रेमाने कोणतेही कार्य सफल होते.मी-मी केल्याने कोणतेही कार्य कधीच घडत नाही. त्यासाठी सयंम खूप महत्त्वाचा आहे,तो सयंम ठेवून सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावे.
     एक छोटासा प्रथम प्रयत्न आमच्या पुण्यात झाला....*4 दिवसीय आंतरराष्ट्रीय काव्य जागर अंतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल भरवून.*2 जानेवारी 2025 ते 5 जानेवारी 2025*...या चार दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.यासाठी भरपूर साहित्यिक हात कामी आले.एकमेकांच्या सहकार्याने इतका मोठा काव्य जागर करता आला...हा ही मोठा इतिहास घडला.नियोजनबद्ध हा कार्यक्रम होता.चहा,नाष्टा,जेवण हे उत्कृष्ट असे होते,महिला सक्षमीकरण साठी विविध उपक्रमांचे आयोजन होते..दांडपट्टा,काठी चालवणे प्रात्यक्षिक, एकांकिका,नाट्यछटा,काव्य संमेलन यांचे आयोजन करण्यात आलेले होते.या काव्यजागरमध्ये शिवाय काही साहित्यिकांना ज्यांचे या चळवळीत  मोठे योगदान होते त्यांना *आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न,2025* नावाचे पुरस्कार ही देण्यात आले. 
        *प्रत्येक साहित्यिकाला एक छानसे,छोटेसे सन्मानचिन्ह,सन्मान पत्र,फुलेप्रेमी लिखित पेन अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधान प्रत सर्वांना देण्यात आली*...ही गौरवास्पद अशी बाब होती.फुलांवर नको तो खर्च करण्यापेक्षा संविधान जागर होणे गरजेचे होते...तो जागर या आमच्या पुण्याच्या पवित्र भूमीत या संमेलनांमधून झाला.घरोघर संविधान पोहचले ही एक अजून जमेची बाजू.विचार मनात येणे आणि तो तडीस नेणे किती गरजेचे ते करून दाखविले.देश,विदेशातून फुलेप्रेमी साहित्यिक तितकेच फुलेप्रेमी श्रोते ही उपस्थित होते.चार दिवस एस.एम.जोशी हॉल साहित्याने गंधून गेला होता...सुंदर अशा रांगोळी ने सर्वांचे स्वागत होत होते.पुढे आल्यावर मागील वर्षात विविध ठिकाणी घेतल्या गेलेल्या काव्य संमेलनाचे फोटो फ्रेम,बातम्यांचे फ्रेम ,सुविचार फ्रेम यांनी स्वागत होते... पाय आपले आपोआप स्थिरावत होते, हॉल मध्ये जाण्यापूर्वीचा संविधान कट्टा सर्वांना आकर्षित करत होता.प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या नयनांनी सारे घेरत होते,साठवत होते...प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता.सर्व पुरुष सुंदर,स्वच्छ सफेद पोशाखात खुलून येत होते.महिला वर्ग हिरव्या साडीत ती सहवारी,नववारी, परकर पोलके मध्ये खुलून दिसत होती.तिने डोक्यावर लावलेले आडवे कुंकू/ गंध भल्याभल्यांना करारी उत्तर देत होते, नजरेत अंगार होता.खूप काही चांगले बदल झाले पण,अजून खूप काही बदल घडणे गरजेचे आहे..हे नजरेतून जाणवत होते.आपले नाव ठेवण्यामागे ही आपल्या पालकांचा काहीना काही हेतू हा असतो.त्या नावाप्रमाणे आपल्या मुलांनी थोडे तरी घडले पाहिजे असा हेतू असतो.त्यांचा पेहराव केल्याने त्यांची प्रतिमा आपल्यात थोडी का होईना विराजते.आपले पाऊल कमीत कमी चुकत नाही...ते चुकू नये यासाठी तो पेहराव करणे गरजेचे आहे.विचारवंतांना डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा डोक्यात त्यांचे विचार जाणे गरजेचे आहे,त्याप्रमाणे आपले वर्तन घडणे गरजेचे आहे.
        एकच विषय होता भिडेवाडा पण त्यावर प्रत्येकाने आपले विविध भाव रेखाटले,मांडले.*मी बोलताच त्याने हंबरडा फोडला,भिडेवाडा बोलला,भिडेवाडा बोलला*..सर्वांच्या ओठांवर या ओळी आपोआप येत होत्या.मन त्या इतिहासात डोकावत होते...आता आपल्याला नवा इतिहास रचायचा आहे....इतिहासाचा साक्षीदार आपला भिडेवाडा होता... पण,त्याला पुन्हा नव्याने उभा करायचा आहे.चूल मुल पुरते महिलांचे जीवन न राहता...तिने अवकाशात भरारी घेवून स्वतः चे अस्तित्व निर्माण करायचे आहे...तिच्या अस्तित्वाची लढाई तिलाच लढायची आहे.ती अबला कधीच नव्हती...नेहमी सबलाच होती....अन् सबलाच बनून रहायचे आहे. जीवनात लाखो संकटे येवो,त्यांना उत्तर देवून स्वतः ला घडवायचे आहे.
         मास्तरांचा धाक होता,म्हणून एवढे मोठे यश संपादन करता आले.वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे असते..ते अचूक केले होते.माझा खारीचा वाटा मला या सत्कार्याला देता आले हे मी माझे भाग्य समजते.चार ही दिवस मला उपस्थिती द्यायची होती....पण, तब्बेत,शाळेची कामे,तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यामुळे दोन दिवस जाता आले नाही याची जरा खंत होती.पण,*4 जानेवारी 2025 व 5 जानेवारी 2025* रोजी वेळ देता आला.सेवा करता आली... सूत्रसंचलन करण्याचा योग आला...... दूर दूर वरून फुलेप्रेमी साहित्यिक पुण्य नगरीत आलेले होते..या निमित्तानं त्यांची भेट घेता आली,विचार ऐकता आले,त्यांना वेळ देता आला.साहित्य दुनियेत रमले की कसे हलके हलके वाटते...एकदम ऊर्जा निर्माण होते... सगळा थकवा दूर निघून जातो.नव्या उमेदीने जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो... हा साहित्यिक वारसा आपल्याला जपायचा आहे.आपणास मिळालेल्या संविधान प्रत चे वाचन करून ते समजून घ्यायचे आहे.कर्तव्य आणि अधिकार या दोघांची अचूक विभागणी केलेली आहे..ती समजून घ्यायची आहे.सर्वात मोठी लिखित राजयघटना आपल्या भारताची आहे.राष्ट्रीय एकात्मता टिकवायची आहे.शांततेचा मार्ग स्वीकारून आपले कार्य आपल्याला करायचे आहे.येथे कोणीच लहान मोठा नाही...प्रत्येक जण माणूस म्हणून जगला पाहिजे.
*शिक्षणाची धरा  कास*
*प्रेमाचा होण्या निवास*
*करा अथक हो प्रयास*
*शमविण्यास क्रुर त्रास*..

   खरं तर भिडे वाड्याचे संवर्धन आहे त्याच रूपात करायला पाहिजे होते पण ते झाले नाही ही खूप खेद जनक बाब आहे.सर्वच समाजाने आणि सरकारने देखील त्याकडे दुर्लक्ष केले ,म्हणजे जाणून बुजून पाठ फिरवली आणि आज भिडेवाडा पाडला गेला पण आता त्या ठिकाणी नुसते राष्ट्रीय स्मारक न उभारता पुन्हा नव्याने मुलींची भव्य दिव्य शाळा बांधावी.जेणे करून तेथे या चिमुकल्या मुलींचा चिवचिवाट तेथे पुन्हा नव्याने ऐकु येईल.आणि या मध्ये कोणतेही राजकारण घडू नये.कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख,किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा उल्लेख होता कामा नये.हाच झेंडा फडकावयचा असे होता कामा नये.जेथे विषमता पेरली जाते तेथे कधीच प्रगती होत नाही.प्रगती करायची असेल तर आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. हे जर त्या काळात घडले असते तर *5 डिसेंबर 2023* रोजी हा भिडे वाडा जेसीबी ने पाडला गेलाच नसता.अजून ही वेळ गेलेली नाही...संघर्ष हा करावाच लागणार...त्या साठी लढा हा द्यावाच लागणार...जे झाले ते व्हायला नको होते...पण,आता काय होणे गरजेचे याकडे आपली वैचारिक ताकद लागली गेली पाहिजे. याच स्मारक मध्ये आताच्या मुलींना मोफत शिक्षण देऊन खऱ्या अर्थाने स्मारक झाल्या पाहिजे.आपल्या भारतात शिक्षण जेव्हा मोफत होईल तेव्हा नक्कीच आपला देश भरारी घेईल.जी गोष्ट मोफत हवी ती च नाही तेथे च सारा भ्रष्टाचार चालू आहे.शिक्षण ही विकत घ्यावे लागते..ही लाजिरवाणी गोष्ट आहे.शिकायचे आहे पण,पैसाच नाही..जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा लोकसंख्येचा विचार होईल.जो वेळ शिक्षणात द्यायला पाहिजे तो दिला जात नाही.नावे ठेवण्यात च आपली हयात आपण घालवतो... इतरांचे कौतुक करणे आपल्या रक्तात का नाही? हसणे,फालतू विनोद करणे,नावे ठेवणे यातच वेळ जातो...कोणी तरी नवीन काही तरी करतो याला साथ देणे गरजेचे आहे.तेव्हा नको त्या गोष्टी मध्ये आपला मौल्यवान वेळ न घालवता..कोणी उत्तम कार्य करत असेल तर त्यांना साथ द्या.त्यांचे जेथे चुकत असेल तेथे रोखठोक सांगायला शिका...चुका वेळेत दुरुस्त करा..एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जगू नका.स्वतः मध्ये सत्याला साथ देण्याची हिंमत हवी....वा वा केल्याने कोणी मोठे होत नाही..प्रत्यक्ष कृतीने होते.म्हणून बोलण्यापेक्षा करून दाखवा....डोळ्यांवर विश्वास ठेवायला शिका...नावे ठेवणे असे नसते उद्योग सोडून द्या.निस्वार्थी भावनेने लढा द्या..नक्कीच विजय आपलाच असणार...आपलीच प्रतिमा उजळेल.जसे आपण आहोत तसेच आपण दिसलो पाहिजे.माणसाने खरे बोलण्याची हिंमत ठेवावी,सत्याची साथ द्यावी.प्रत्येक अशक्य वाटणारे कार्य सहज घडेल.चला हातात हात देवून,हा लढा नव्या जोमाने लढू.

*फुले प्रेमी*
*सौ.प्रतिमा अरुण काळे* 
*निगडी प्राधिकरण,पुणे,44*
*मोबाईल नंबर:- 9405042938/ 8830654661*

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...