Skip to main content

धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी आंदोलनाची धार बोथट होऊ देऊ नका ".. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.


भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूकीपूर्वीची धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची मागणी तीव्रतेने महाराष्ट्र राज्य भर जाणवत होती.मागणीची धार आता निवडणुकीनंतर बोथट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.ही धार समाज बांधवांनी बोथट होऊ देऊ नये. असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आवाहन केले आहे.पुढे एका मुलाखतीत भारत कवितके म्हणाले," पूर्वी आपला समाज विखुरलेल्या अवस्थेत, शिक्षणापासून दूर, अशिक्षित होता, त्यामुळे आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव झाली नसेल हे कारण सांगून आपले पूर्वज यातून सुटले असले तरी येणारी आपली पिढी मात्र आपणाला माफ करु शकणार नाही.कारण आता समाज चांगलाच जागृत झाला असून शिक्षणाने,विचाराने खूप पुढे गेला आहे.आपल्या आस्तित्वाची त्यास पूर्ण जाणीव झाली आहे.संविधान समाविष्ट आपली मागणी योग्य असून ही आपल्या समाजाला आतापर्यंतच्या राज्यकर्ते यांनी एसटी आरक्षण अमंलबजावणी पासून दूर ठेवले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यातील सुशिक्षित तरुण बांधवांनी पुणे येथे अधिवेशन घेऊन राज्य भर आमरण उपोषण, रास्ता रोको, ढोल बजाओ आंदोलन, निवेदन देणे, अशी विविध प्रकारची आंदोलने करून समाज जागृती केली.छत्रपती संभाजी नगर येथील आदिवासी विकास कार्यालयाकडून धनगड प्रमाण पत्र रद्द करण्यात जरी यश आले तरी आपणास पूर्ण लढाई जिंकता आली नाही.यांची खंत वाटते, विधानसभेत आपले समाजाचे विविध पक्षातून पाच आमदार निवडून आले, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे झाले.या सर्व सकारात्मक गोष्टीनी हुरळून न जाता पुढील अर्धवट राहिलेली लढाई सुरू करायला हवी, राजभवन मध्ये राज्यपाल ला भेटून सविस्तर माहिती देऊन त्यांनी फक्त विचार करून कारवाई करु असे सांगितले.त्यासही बराच वेळ गेला.एकनाथजी शिंदे यांनी पंधरा दिवस मुदत देऊन ही दुर्लक्ष केले.दुसर्या बाजूंनी आदिवासी चे आमदार आपल्या एसटी आरक्षण अमंलबजावणीला राज्य भर आंदोलने करून विरोध करत होते.आपले पाच आमदार विधानसभेत आपल्या रास्त मागणी साठी डरकाळी फोडतीलच यावर समाजाचा पूर्ण विश्वास आहे, तरीही सकल धनगर समाजाने ढिले राहता कामा नये,निवडणूकी पूर्वीची धार पुन्हा आंदोलनासाठी आणावी,जो पर्यंत आपली रास्त मागणी पदरात पडत नाही तोपर्यंत आंदोलन व्हावीत, मागणी मान्य झाली तर समाज कशाला आंदोलने करेल?
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मोबाईल..8652305700

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...