पुणेः प्रतिनिधी अमरावती येथील कला जीवन बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉ अलका नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हडपसर येथे बहुभाषिक द्विशतकीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले . संमेलनाध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे शहराध्यक्ष रा.काँ.( शरद चंद्र पवारगट) प्रशांतदादा जगताप, माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ गजलकार म भा चव्हाण, प्राचार्य सूर्यकांत वैद्य, कविसंमेलनाध्याक्षा प्रतिभाताई मगर, समाजसेवक दादासाहेब सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ व संस्थेच्या सचिव सौ.अर्चना अष्टुळ हे गेली तेरा वर्षापासून कवी कट्टा अव्याहतपणे सुरु ठेवला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठीची रात्रदिवस सेवा करत आहेत म्हणूनच या संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सम्राट च्या सदस्य सह मराठी भाषेचे रसिक यांनी अष्टुळाचे अभिनंदन केले.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment