(नवी मुंबई): आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, योग विद्या निकेतन वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिला दिन विशेष कार्यक्रम 'माझा प्रवास उलगडताना' संपन्न झाला. नवी मुंबईतील कर्तबगार महिलांशीशी संवाद त्यांचा जीवन प्रवास असा या कार्यक्रमाचा विषय होता. प्रातिनिधिक स्वरूपात काही खास महिलांचा तेथे सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार मा.दुर्गेश सोनार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा.नंदकिशोर जोशी, कार्यवाहक डॉ.अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षमा वाखारकर यांनी केली तर सूत्रसंचालन सौ.ऋतुजा गवस यांनी केले. या कार्यक्रमाला राधा गानू, शुभांगी पाटील, मीरा जोशी, स्मिता वाजेकर, श्रध्दा साळस्कर, अक्षता गोसावी ऋतुजा गवस, कल्पना देशमुख, भारती वार्डेकर यांचा साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवी मुंबईतील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नेहमीच अभिनव संकल्पना आणि उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक आणि साहित्यिक, सामाजिक कार्यक्रमही राबविले जातात. तसेच नवसाहित्यिकांना येथे व्यासपीठ व संधी दिली जाते. मा.दुर्गेजशी सोनार यांनी अतिशय सुंदर असा रसिकांशी संवाद साधला. विठूमाऊली संत साहित्य, हायकू काव्य प्रकार उदाहरणासह सांगितला. भावनिक, आध्यात्मिक जोड देऊन संवाद केला. तसेच 'शब्द संवाद' महिला विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*
*प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई) कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...
Comments
Post a Comment