ठाणे: नवी मुंबईतील कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांना नुकताच मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचे ते कार्यकारी संपादक असून मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात येथील विविध साहित्यिक मंचावर संचालक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप बडदे हे गेल्या वीस वर्षांपासून साहित्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व राष्ट्रस्तरीय अशी ४० हून अधिक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त आहेत.
रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, रेगे सभागृह, ठाणे येथे ज्येष्ठ साहित्यिक मा.अशोक बागवे, मा.डॉ. विनायकराव जाधव, मा. सिद्धार्थ कुलकर्णी, मा.जयप्रकाश घुमटकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन मराठी साहित्य मंडळ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कवडे यांनी मोठ्या थाटात केले आहे. सूत्रसंचालन अनघा जाधव व विद्या थोरात काळे करणार आहेत.
Comments
Post a Comment