Skip to main content

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- उपप्रादेशिक अधिकारी सोनवणे

वार्ताहर (श्रीरामपुर)::   जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला . चालू शैक्षणिक  वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी  याबद्दलचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो असे त्यांनी गौरवोद्गार काढले. शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धापरीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान  करण्यात आला. जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बालकलाकारांचाही गुणगौरव करण्यात आला. केंद्रस्तरीय लांब उडी,उंच उडी,धावणे, कथाकथन,आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे,गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, मा.सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम,असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे,एकनाथ ठाकरे, सराल्याचे सरपंच शंकर विटेकर,किरण बनसोडे, बबन तात्या औताडे,रवींद्र मोहन,प्रकाश मोहन, आशाबाई फुलारे,त्तायर शेख,रामभाऊ वमने, देविदास वमने, वैभव नेद्रे,गणेश लबडे,विजय मोहन,अविनाश उमाप, अंकुश मोहन,सोनल औताडे,मनोज घोडके,सचिन वमने,विलास औताडे, राहुल औताडे,जाकीर शहा,कालिंदी घोडके,रूपाली घोडके, रेश्मा शेख,शीतल ठाकरे,आसाराम लबडे सुवर्ण वमने,सुनीता ठाकरे,शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे,मीरा ससाने,मीनाक्षी जाधव यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...