Skip to main content

महापुरुषांच्या विचाराची काव्यात्मक अक्षर पेरणी बहरली

पुणे: प्रतिनिधी        महापुरुषांच्या 
विचाराचा वारसा  व विचार समाजामध्ये रुजावीत व   ते विचार अंगीकृत करावे यासाठी साहित्यिक कविता द्वारे विचारातून  समाज परीवर्तन करत आहेत.   असे मत ॲड.शरद दरेकर यांनी प्रस्ताविकेत मांडले.
साहित्य सम्राटचे २०४ वे कवीसंमेलन व वारसा विचारांचा ग्रुप शिक्रापूर  यांचे संयुक्त विद्यमानाने सोनल कॅफे 1906 पाबळ रोड शिक्रापूर येथे आयोजित केले होते. कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली. वारसा महापुरुषांच्या विचारांचा या विषयासह वास्तववादी आणि मनाला भावणाऱ्या कविता व गझल मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.   
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे 
आदरणीय विनोद अष्टुळ यांची प्रबोधनात्मक भाष्य करणारी स्वराज्य ही सुप्रसिद्ध गेय कविता, युवा कवी सागर जाधव यांचे प्रेमगीत, रफिक इनामदार यांची तुपातली पोळी, सूर्यकांत नामूगडे यांची वय झालं म्हणून काय झालं, तसेच बबन धुमाळ यांची गझल, अशा अनेक दर्जेदार काव्य आणि गझलांना उपस्थित काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.
  विचारपीठावर मान्यवर कवी किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, बबन धुमाळ, मंगलाताई सासवडे आणि वारसा विचारांचा ग्रुपच्या अध्यक्षा अलका जोगदंड, आणि साहित्यसम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ उपस्थित होते.
यावेळी  नानाभाऊ माळी,  रूपाली भोरकडे, दशरथ दुनधव, सागर जाधव, बाहुबली मिसाळ, रफिक इनामदार, गजानन गायकवाड,  उषा संतोष मासळकर , रोहिणी दरेकर, नंदिनी भोरकडे, महेंद्र पगार, गोरक्ष ताठे, निळू चौरे, निलेश गुंड, शहाजी घोडे, ॲड. शरद दरेकर, विशाल काळोखे, शिवाजी घोडे, कोमल घोडे, पूजा घोडे, मंदाताई भुजबळ,  इत्यादी कवी, कवयित्री आणि काव्य रसिक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर  आभार गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...