Skip to main content

*चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*



दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी  मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे  अध्यक्ष पं. सुरेश  साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह प्रकाशनासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.

पं. साखवळकर सरांनी चंद्रकिरण काव्य मंडळाच्या स्थापनेचा आणि त्याच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांतील कवी विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करून तरुण पिढीला साहित्याशी जोडण्याचे महत्व अधोरेखित केले. डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी उत्तम वाचन, रसिकता आणि जाणीवांमध्ये जिवंतपणा फुलवण्याचे महत्त्व स्पष्ट करत काव्यलेखनावर मार्मिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात पीसिईटी इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM च्या निर्मिती प्रमुख RJ माधुरी कुलकर्णी ढमाले यांचा उपाध्यक्ष श्री. श्रीकांत पेंडसे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर RJ माधुरी यांनी "किती बोलतो आपण सारे" ही त्यांची स्वरचित कविता रसिकांसमोर सादर केली.

कार्यक्रमाचे पहिले सत्र काव्य संमेलन म्हणून आणि दुसरे सत्र गझल मुशायर्‍यासाठी आयोजित करण्यात आले. सौ. रश्मी थोरात यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन केले, तर गझल मुशायऱ्याचे संचालन सौ. अर्चना मुरुगकर यांनी नेटकेपणाने पार पाडले.
श्री. श्रीकृष्ण मुळे यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. दत्तात्रेय मेढी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्षा सौ. संगीता पवार, कार्यवाह सौ रश्मी थोरात,  सहकार्यवाह सौ. माधवी खडक्कार, खजिनदार श्री सतीश साठे, श्री. श्रीकृष्ण मुळे आणि श्री. श्रीराम घडे यांनी मोलाचे योगदान दिले.

चंद्रकिरण काव्य मंडळाचा हा ३१ वा वर्धापन दिन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि साहित्यिक वातावरणात संस्मरणीय ठरला.


---

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...