Skip to main content

*कवितेच्या पारावर प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात संपन्न*


            महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला.

            हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गीतगायन, भारूड व गझल अशाप्रकारे कवींनी विविध अंगाने सादरीकरण केले.

            या मैफिलीत अनिल सोनवणे, कल्पनाताई देशमुख, रश्मी राऊत, डॉ.सुमेध वैद्य, काजल आठवले, श्वेता मांदडकर, स्वाती भोसले, महेश भोसले, काव्या भोसले, हर्षल देशमुख, राधा गानू मॅडम, नारायण लांडगे, नेत्रा, सुनेत्रा, मंगलामाई या कवी कवयित्री तसेच कलाकारांनी उत्कृष्ट सहभाग घेऊन आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले. 

            अशा या रंगतदार मैफिलीला अध्यक्षा म्हणून शास्त्रीय गायीका मा. राधा गानू या लाभल्या होत्या. साहित्यातील प्रवास व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रबोधनपूर्वक ठरले. द.भा. धामणस्कर यांच्या सहवासातील स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेले काही किस्से त्यांनी सांगितले. मैफिलीत शारदा स्तवन सादर करून गानू माईंनी अनोखी शोभा आणली व मान्यवरांचा उत्साह द्विगुणित केला. मैफिलीला मार्गदर्शिका कल्पनाताई देशमुख यांच्या कन्या कु. प्रतिक्षा देशमुख या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. संशोधन क्षेत्रातील कार्याचा प्रवास आणि अनुभव मांडत असताना एक कणखर व बाणेदार असे तरूण नेतृत्व प्रतिक्षाच्या व्यक्तीमत्त्वाबाबत सहजपणे येथे टिपण्यात आले. या मैफिलीची संकल्पना आखून कवी/ पत्रकार प्रदीप बडदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले तसेच सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कवितेच्या पारावर जमलेल्या सर्व साहित्यिक कलाकारांनी नवी विचारप्रणाली मांडून एकमेकांचा निरोप घेतला. 

*--प्रदीप बडदे, (नवी मुंबई)*

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...