भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम
पंढरपूर बस स्थानकात सध्या गर्दीच्या हंगामात रात्र दिवस बेवारसांचे साम्राज्य पसरले असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांच्या निदर्शनास आले आहे.भिकारी, गर्दुल्ले, दारुडे आणि बेवारस लोकांनी बस स्थानकातील प्रवाशांना बसण्याच्या बाकावर ऐसपैस झोपलेले दिसतात, पाणी किंवा इतर पेय पिऊन तेथेच पिचकारी मारतात, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करणारे सुध्दा डोक्याखाली प्लास्टिक गुंडाळून झोपलेले असतात,बस स्थानकात उभे असलेल्या पुरुष महिला व बाल वृध्दांना बाकावर बसून देत नाहीत,या प्रकरणाकडे महामंडळाचे प्रशासन लक्ष देत नाही.सध्या उन्हाळ्याचे दिवस, शाळेचे सुट्टी चे दिवस, अनेक लहान मोठ्या यात्रा या मुळे पंढरपूर बस स्थानकात रात्र दिवस प्रवाशांची गर्दी असते.भिकारी पिण्याच्या पाण्याचा वापर अंग धुण्यासाठी करतात, प्रवाशी बसण्याच्या बाकावर आणि बाकाखाली कुत्री बसलेली झोपलेली आढळून येतात.तसेच या ठिकाणी साफसफाई करणारे महिला कामगाराचा मोठा ताफा दिसून येतो तरीही स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात.एकंदरीत येथील स्थानिक महामंडळ प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करु नये,अशा लोकांवर कारवाई करावी, त्यांना येथे वास्तव्य करु देऊ नये, लवकरच आषाढी यात्रा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Comments
Post a Comment