पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्थापित प्रभू श्रीराम मंदिर येथे फुटलेल्या पत्रातून पाण्याची गळती.
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाली असल्याचे दिसून येते.पंढरपूर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी येथील मंदिराच्या व्हरांड्यात पाणीच पाणी जमा झाले होते.आमचे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके यांनी यावेळी मंदिरात दर्शनासाठी गेले असता व्हरांड्यात पाणीच पाणी आढळून आले.येथील पत्र्यांना ठिक ठिकाणी छिद्रे पाडली आहे, त्या मधून मंदिराच्या व्हरांड्यात पाणी पडत असते, येणाऱ्या आषाढी वारी पूर्वी व पावसाळा सुरू होण्यापूर्वी छिद्राची दुरुस्ती करावी.
Comments
Post a Comment