Skip to main content

*प्रा. रावसाहेब राशिनकर यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड*

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता. नेवासा, जि. अहिल्यानगर चे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब भिकाजी राशिनकर (साहेब) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी  कोळेकर साहेब यांनी केली आहे. प्रा. रावसाहेब राशिनकर यांचे शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून ते  रयत समाचार, दैनिक आकर्षण, दैनिक जलभूमी, दैनिक बीड प्रसार, दैनिक लोकआवाज, दैनिक लोकमंथन, साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी यांसह विविध वृत्तपत्र, ऑनलाईन वेब पोर्टल, डिजिटल न्यूज चॅनल साठी अहिल्यानगर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय साहित्य कस्तुरी या डिजीटल आवृत्तीचे मुख्य संपादक आहेत. त्यांना विविध संस्था व संघटना यांचेमार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रात साहेब या टोपणनावाने काव्यलेखन करणारे शीघ्रकवी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात सहभाग नोंदवलेला आहे. अनेक वर्षापासून ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख  म्हणून जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत होते. त्यांच्या या निवडीबाबत महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर,उपाध्यक्ष सागर पाटील, सोमनाथ पाटील, कार्यवाह प्रतापराव शिंदे,राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी,प्रशांत लाड, डॉ. सुनिल भावसार, प्रमुख मार्गदर्शक डॉ. शंकर अंदानी, प्रा. बापुसाहेब कांबळे,बाबासाहेब नेर्ले, अण्णासाहेब कोळी,
संजय नवले, राजेंद्र गोसावी,  भोला गुप्ता,भगवान देवकर,
बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख,उपसंपर्क प्रमुख-श्री राजेश जोष्टे
अशोकराव शिंदे,श्री राजू मोरे
राज्य कार्यकारिणी सदस्य,श्री सुनिल कांबळे (कोल्हापूर ), प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे,श्री राजकुमार चौगुले (किणी), श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव)  ,श्री अशोक इथापे (सातारा) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा),  डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर) ,अनुज केसरकर (मुंबई),कोकण विभाग अध्यक्ष
 श्री सुनील पवार,कायदेविषयक सल्लागार ॲड.प्रकाश साळसिंगिकर, (मुंबई हायकोर्ट)
ॲड. नितीन दसवडकर ,(पुणे)
ॲड.निलेश यादव,ॲड.जितेंद्र पाटील ,(कराड) अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ मंडलिक,सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत रामनाथजी वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी संभाजीराव म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे, संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ दीपक शिंदे, नानासाहेब अंबाडे, शालेय समिती सदस्य प्रा.अशोक चौधरी, प्राचार्य शिवाजी रामराव सावंत, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे, उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे यांसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...