पुणे:- गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २४ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे क्रांती दिनानिमित्त उत्साहात बालसभा पार पडली.इयत्ता सहावीच्या वर्गाकडे या सभेचे नियोजन होते.सभेचे अध्यक्षस्थान ६ वी अ मधील शिवम कांबळे ने स्वीकारले,तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.संगीता गुरव मॅडम या होत्या.तु बुध्दी दे या प्रार्थनेने सुरुवात करून सर्व बालसभा सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा प्रज्वलन झाले.६ वी मधील विद्यार्थ्यांनी स्वागतम् शुभ स्वागतम् हे स्वागत गीत सादर केले.संस्थेचे संस्थापक माननीय दाभाडे सर,प्राचार्या सौ.वाळुंज मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षिका सौ.घावटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ६ वी ब मधील रूद्र कदम ने केले तर निवेदन ६ वी अ मधील दिपल पाटील व मीरा मगर यांनी केले. "थोर क्रांतिकारक" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे परीक्षण मावळे सरांनी केले.यात विघ्नेश सोळसे,श्लोक गुंजाळ,साई माळे,गौरव अडागळे,मयूर पाटील,संस्कार मेनकर, जान्हव...