Skip to main content

Posts

*स्व परिचय*

 *1)पूर्ण नाव:*  *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे*   *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,*   *तालुका: पनवेल,*   *जिल्हा:रायगड.*  *3) मूळ गाव.*      *मुक्काम पोस्ट:  पाडळी दर्या,*       *तालुका: पारनेर*       *जिल्हा: अहमदनगर*  *4)शिक्षण*: *DSM,BABED.*   *5)वय : 56*  *6)पद*: *सहाय्यक शिक्षक*  *7) शाळा ,नाव, पत्ता*:        *मोहिते पाटील विद्यालय,*          *वीर तानाजी भोसले मार्ग*          *पनवेल घाटकोपर लिंक रोड,*           *मोहिते पाटील नगर,*            *मानखुर्द, मुंबई- ४०००४३*  *8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६*  *9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..*  *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१...

*नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन* *विशेष लेख*

*लेखिका* *अनुपमा जाधव* *उपक्रमशील, आदर्श शिक्षिका,* *शाळा..के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू*    श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो.भाऊ बहिणीच्या या पवित्र प्रेमाला राखी पौर्णिमेच्या दिवशी जणू उधाणचं येते.या दिवशी बहिण सुंदर पाट मांडते.पाटाभोवती विविध कलाकुसरतेने रांगोळी काढते.व भावाला ओवाळण्यासाठी ताटाची आकर्षक सजावट करते.भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षदा लावते.व त्याला ओवाळते, राखी बांधते.मिठाई भरवते. भावाचे तोंड गोड करते.मग भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या ताटात पैसे, भेट वस्तू देतो.त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन खूष ठेवतो.            आपल्या भावाची प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याने बहिणीचे रक्षण करावे.ही त्यामागची भावना असते.आपला भाऊ सुखी, समाधानी, आनंदी असावा.त्याने आपल्या आई वडिलांचा ,परीवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक बहिणीला वाटत असते. तसेच आपल्या बहिणीला ही कोणत्याही प्रकारची उणिव भासू नये यासाठी भाऊ तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत असतो.एवढं राखीच्या धाग्याचं महत्त्व आहे. ...

पार(स्वा)तंत्र्य

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या  पूर्व संधेला घडली एक अघटित घटना  कोलकात्यातील एका डॉक्टर भगिनीचा  करुनी विनयभंग खून केला काही  नराधमानी  आज मी विचारतो एक प्रश्न तुम्हा सर्वांना  आहोत का तुम्ही -आम्ही खरोखरच स्वतंत्र ?  सडलेली आमची डोकी शोधत असतात  पीडितेची जात आणि आरोपीचा धर्म  आहे आमचा प्रधान आंधळा गृहमंत्र्याचे आहेत कान बहिरे  न्याय कसा मागावा न्याय देवतेला  आहे इथली व्यवस्था भ्रष्ट आणि लाचार  बुरसटलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या  आहेत साक्षीदार घटना हजार  आहे स्वतंत्र फसवे  या देशाचे, भगिनी आहेत असुरक्षित आणि युवा बेरोजगार  झाले आहे माझे मन बधिर आणि सुन्न  नाही साजरा करणार मी आता स्वातंत्र्य दिन  देश अजूनही आहे पारतंत्र्यात  उगवेल ती ही सोनेरी पहाट  होऊनी सुजाण नागरिक  घेऊ आपण सर्वजण मोकळा श्वास  कवी भूषण सुकेशनी वामनराव

*देशभक्ती...*

  उद्या 15 ऑगस्ट...दिवसभर नदीला  पूर यावा तसे सगळीकडून देशभक्तीचे मेसेज एकामागून एक सर्वांना येत राहणार..कोण चौकात गाणे वाजवणार, कोण पूजा ठेवणार , कोण गाड्यावरून,सायकल वरून झेंडे मिरवणार...यात वाईट असे काहीच नाही. उलट आजही आपली देशभक्ती प्रत्येकात शाबूत आहे याचे हे उदाहरण आहे.  पण हीच देशभक्ती आपल्या रोजच्या वागण्यात का? येत नाही ...जेव्हा देशात आतंकवादी हल्ला होतो तेव्हा सगळा देश संतापात शोकात असतो, सगळी यंत्रणा अचानक जागी होते.. कोणाला तरी पकडले जाते..पण हल्ला यशस्वी झाला म्हणजे त्यांचे काम फत्ते झाले असे होते.त्यांना मरणाची भीती नसते..कारण त्यांचा ब्रेन आधीच वॉश केलेला असतो...आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे याची त्यांना त्यांच्या आका ने हमी दिलेली असते (त्यांच्या भावनेचा,गरिबी अन् अशिक्षिपणाचा फायदा घेत). अशावेळी जे कोणी बाहेरच्या देशातून आतंकवादी येतात  तेव्हा ते एकटे काही करू शकत नाही जो पर्यंत त्यांना आपल्या देशांतून कोणी मदत /सपोर्ट करत नाही..यांची मदत करणारी यंत्रणा शोधून वेळीच ठेचून काढली पाहिजे.. प्रत्येक गल्लीतील,गावातील, चाळीतील,इमारतीतील ना...

मी नवयुवक भारताचा🇮🇳

 स्वातंत्र्यासाठी दिनरात  लढले वीर जवान सारे  वीरांच्या बलिदानाने घुमती  लोकशाहीचे अखंड वारे....१            मी नवयुवक भारताचा           अखंडित  ऋण स्मरतो             देशाचा विकास करण्या           जागतिकीकरणाचा  मार्ग चालतो....२  देशप्रेम, संस्कार  शिदोरी  तरुणाईच्या मनात रुजते कला,क्रीडा क्षेत्राची भरारी  देशाच्या मुकुटावर सजते.....३            ज्ञानविज्ञान क्रांतीने  दाखवले             उत्कर्षाचे मार्ग अनेक             सर्वांगीण विकासाचे             शिलेदार आहोत हरेक..४    स्वाभिमानी देशभक्ती,     एकता भारताचे भूषण     अवकाशात घेतो भरारी     परिवर्तनाचे लेवून आभूषण....५  ✍️सौ जयश्री पंकज बोरसे कल्याण

*बलिदान*

समर्पिले हो आपुले प्राण त्यागिले ज्यांनी  स्वजीवन घेऊन स्वराज्याची  आण वाढविली  स्वतः ची शान .. स्वभूमिस  कित्येकजण पडले धरातीर्थी बहुजन देशासाठी सोडीले स्वप्राण करू या प्रणाम नमन ... अनादी अनंत महान कार्य मारता शत्रूस मरेन झुंझेन केले त्यांनी जीवन सार्थ देशभक्तासी शतश: नमन ... *© ®✍️ सौ.मीना घोडविंदे*

* डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय सातारा यांचा कै. भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर

कवि सरकार इंगळी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा तर्फे तर्फे दिले जाणारे कैलासवासी भास्करराव माने प्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये कादंबरी कथा कविता बालसाहित्य यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त लेखक व साहित्य कृती यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार रु २५०० रु व स्मृतीचिन्ह १) कडेलूट - कादंबरी       ले .डॉ श्रीकांत पाटील २ )  'काळ ' मेकर लाइव्ह - कादंबरी        ले - बाळासाहेब लबडे राज्यस्तरीय अक्षर गौरव  विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप रु १००० व स्मृतीचिन्ह १) वसप - कथासंग्रह          ले - महादेव माने २ ) प्रकाश पेरणी - कवितासंग्रह         कवी - सुभाष कवडे ३ ) वसुंधरेचे शोधयात्री - संकीर्ण          ले - डॉ अनुराग  लव्हेकर ४)  कुणब्याची पोरं - कथासंग्रह           ले - आप्पासाहेब खोत ५ ) भैरवायन - कादंबरी            ल...