Skip to main content

Posts

पितृपक्षात अन्नदान**"स्वामी" संस्थेचा कॅन्सरग्रस्त आणि गरजूंसाठी उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "स्वामी" संस्था पितृपक्षादरम्यान १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १६ दिवसांच्या कालावधीत अन्नदान मोहीम राबवत आहे. सदर उपक्रमाचा उद्देश गरीब, गरजू आणि मुंबईत उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह धान्य उपलब्ध करून देणे हा आहे. संस्था दानशूर व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ त्यांच्या संबंधित तारखांना अन्नदान करण्यासाठी आमंत्रित करते. देणगी धान्य, रोख रक्कम, धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहाराच्या स्वरूपात दिली जाऊ शकते. कलम ८०जी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्रता सुनिश्चित करण्यासाठी योग्य पावती प्रदान केली जाईल. अधिक माहितीसाठी आणि या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी, कृपया 8928061391 वर संपर्क साधा. कृपया दिलेल्या भ्रमणध्वनीवर ऑनलाइन पेमेंट व्यवहाराचा स्क्रीनशॉट पाठवावा अशी विनंती "स्वामी" संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

ओपन'साठी २० तर 'ट्रायबल'साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा ट्रायबल फोरम : परदेश शिष्यवृत्तीत अन्याय

नंदुरबार : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वच घटकांसाठी परदेश  शिष्यवृत्ती योजना आहे. यात सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी  उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये आहे  अन् अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी केवळ ६ लाख रुपये आहेत.उत्पन्नाच्या फरकामुळे सर्व सामान्य आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही.ही बाब अन्याय करणारीआहे.त्यामुळे आदिवासींचीही उत्पन्न मर्यादा वाढवून २० लाख करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २००५ पासून परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविल्या जाते.याकरिता शिष्यवृत्तीची योजना असून उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये आहेत.यात भूमिहीन आदिवासी कुटुंबातील, दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांस प्राधान्यक्रम दिला आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत एकतर योजना पोहोचली नाहीत.कदाचित काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहो...

*महाराष्ट्र राज्य नाभिक महिला संघटना उरळीकाचनं पदाधिकारी नियुक्ती*

 समाजातील महिलांनी एकत्र येऊन ऐक्य जपावे शासकीय योजनांचा लाभ मिळावा , माहिती मिळावी या करता समाज जागृती निर्माण व्हावी म्हणून सतत धरपडणार्या  महाराष्ट्र राज्य नाभिक महिला उप अध्यक्षा सौ सुवर्णा सौदागर वाघमारे साहित्यिक प्रबोधनकार उद्योजिका पत्रकार या क्षेत्रातून महाराष्ट्रभर फिरताना माणूस म्हणून जगताना समाजाचे देणे लागतो. या हेतूने सतत कार्यरत रहाणं  महाराष्ट्र राज्य नाभिक महिला अध्यक्ष उरळीकाचनं  सौ माया किशोर जाधव जेष्ठ नाभिक समाजाच्या महिला अध्यक्ष म्हणून निवड केली  सौ आशा दिपक बंड उप अध्यक्षा  सौ रूपा डिगे कार्य अध्यक्षा  सौ कांचन श्रीमंत यादव कार्य अध्यक्षा  सौ मिना बाळासाहेब पवार खजिनदार  सौ माया गायकवाड (सचिव  सौ सुलोचना सुरेश पवार  सौ हेमा भानुदास जाधव उप सचिव  सौ सोनाली प्रितेश बंड  सौ सुप्रिया सागर बंड  सौ कल्याणी मनोहर शिंदे  पुनम धीरज जाधव  पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली  महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना महिला उप अध्यक्षा सौ सुवर्णा सौदागर वाघमारे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन स्वागत...

*सचिन बेंडभर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार*

ता.02 ( पुणे प्रतिनिधी)            वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा आणि शिक्षण आयुक्त मा. सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.           शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज, राज्य आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा यावर्षी हा बहुमान महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेली शाळा व गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीला मिळाला असून या शाळेतील साहित्यि...