सुनील शिरपुरे/यवतमाळ चंद्रपूर:-१ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा "हे विश्व शब्दांचे" हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे. या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात "हे विश्व शब्दांचे" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श...