Skip to main content

Posts

*शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे**१३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन**साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर**कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा*

*आहुर्ली प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन* --------    साहित्य हे वास्तवाशी निगडीत असावे.सामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवुन त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदाराच्यां हातचे बाहुल नको, तर प्रस्थापितानां देशोधडीला लावणार्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य.शेती मातीचा लढा साहित्यातुन प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने मोडाळे ता.ईगतपुरी येथे आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.    व्यासपिठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, जेष्ठ साहित्यिक तथा परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष देविदास खडताळे, परियदेचे संघटक अमोल कुंभार, उद्योगपती तानाजी गायकवाड, अभिनेते तथा साहित्यिक अजय बिरारी,लेखक प्रशांत कोतकर जळगाव, दिलीप कजगावकर, माणिकराव गोडसे, पुंजाजी मालुंजकर, न्या.सलंत पाटिल, परिषदेचे उत्तर म...

शेगाव मध्ये गजानन महाराज मंदिर भोवती फेरी वाल्यांचा विळखा.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरा भोवती फेरी वाल्यांचा विळखा असल्याने गजानन भक्तांना या ठिकाणी खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.विशेष करुन मंदिराच्या मुख्य दरवाजा जवळ आणि संपूर्ण रस्त्यावर फेरीवाल्यांचे साम्राज्य असल्याने भाविकांची खूप च गैरसोय होते.रस्त्यावर आणि मुख्य दरवाजा जवळ टाळ विकणारे,हार,गजरे, कपाळावर गंध लावणारे, मुख्य दरवाजा अडवून आपल्या वस्तू ची मोठ्या ओरडून, भाविकांच्या अगदी जवळ येऊन वस्तू तोंडापर्यंत नेऊन विक्री करताना दिसतात.मुख्य दरवाजा जवळ कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक ही कोणतीही फेरीवाल्यांवर करीत नाहीत.मंदिरापासूनचा बाहेरुन रस्ता तर फेरिवाले राजरोसपणे मोठं मोठ्याने ओरडून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.पोलीस वाहन व वाहतूक नियंत्रण पोलिस ही फक्त मेन रस्त्यावर कर्तव्य करताना दिसतात.रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध ही फेरीवाले आपली दुकाने थाटून आपल्या वस्तू ची विक्री करताना दिसतात.प्रासादिक वस्तू, फोटो ची दुकाने, चहा नाश्ता ची दुकाने,खेळणीची दुकाने, हळदी कुंकू,अशा फेरीवाले मुळे खरोखरच भाविकांची चालताना कोंडी होते, वृध्...

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहावे.. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पुणे येथील वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा करीता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षी ही पुणे वाफगाव यैथे होणाऱ्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा.शूर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार आहोत.वयाच्या अवघ्या २४ वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८०५ मध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतः राज्याभिषेक करून ते होळकर घराण्याचे महाराजा झाले.छत्रपती शिवाजी महाराज नंतर राज्याभिषेक करून महाराजा बनलेला यशवंतराव होळकर हा एकमेव राजा होय.इंग्रजांना लढाईत १८ वेळा पराभूत करून सळो की पळो करून सोडले होते.तमाम धनगर समाज बांधवांनी आपसातील मतभेद विसरून,पक्ष संघटना संस्था, प्रतिनिधी या एकत्र येऊन पुणे वाफगाव यैथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे.असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक ग...

सर्व प्रियजनांना सस्नेह नमस्कार शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४पितळखोरा लेणी - अभ्यास दौरा (लेणी वर्णणासहीत)

     *दान पारमिता फाऊंडेशन -  नाशिक*  या लेणी संवर्धक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण अंदाजे १०० ते १२५ लोक पिताळखोरा लेणी येथे क्षेत्र भेट केली.निमित्त होतं एक दिवशीय कार्यशाळा.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनील खरे सर आणि त्यांचं प्रतिरूप असलेले संस्थेचे मुख्य पदाधिकारी सन्माननीय संतोष अंभोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुव्यवस्थित संपन्न झाली.संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी भारतातील प्राचीन धम्मलिपी ऑनलाईन पध्दतीने शिकून झाले आहेत.धम्मलिपी शिकविणे व लेणी संवर्धनासाठी कार्यशाळा घेणे असे उपक्रम संस्था नियमित राबवित असते.मी या संस्थेशी एक विद्यार्थी म्हणून जोडला गेलो व आज संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून कामकाज करीत आहे याचं मला खूप अप्रूप व समाधान वाटतं.ही कार्यशाळा दिवसभर चालली.मुख्यपदाधिकाऱ्यांनी लेणीची अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली.धम्मलिपी मध्ये लिहलेले प्राचीन शिलालेख वाचून दाखवले त्याचं मराठी अनुवादही सांगितले.सदर शिलालेख धम्मलिपी मध्ये लिहलेले आढळत असून शिलालेखांची भाषा प...

आरटीओच्या ई प्रणाली नियमाच्या धोरणामुळे रुग्णवाहिका सेवा अडचणीत.

पनवेल / प्रतिनिधी  रुग्णवाहिका ही अत्य आवश्यक सेवेमध्ये मोडत असून त्याच्यावर वेग मर्यादाच नियंत्रण  आणले आहे.  आरटीओच्या ई प्रणाली नियमामुळे  रुग्णवाहिकाच्या  वेगाला  ला लगाम लागणार आहे. या लगामामुळे रुग्णाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना नेताना रुग्ण सिरीयस कंडिशन होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. या घडणाऱ्या दुर्घटनेला आरटीओ प्रशासन जबाबदार राहील. त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी. कारण पेशंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना रुग्णवाहिका  वेग  इ चलन दंड आकारत आहे. आरटीओ प्रशासनने रुग्णवाहीका  साठी लागणारे इ चलन दंड बंद करण्यासाठी गांभीर्याने विचार करावे. अशी मागणी  महाशक्ती ऍम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य  संघटनेने केली आहे. कोट   रुग्णवाहिकेला वेग मर्यादा लावल्याने रुग्ण हॉस्पिटला पोहोचायला  उशीर होईल.त्या मुळे रुग्णाचा  जीव धोक्यात येऊ शकतो.रुग्ण दगवू शकतो. त्या मुळे आम्ही रुग्णाच्या जीवाशी खेळू शकत नाही  आम्ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आमची जीवाची बाजी पणाला लावत असतो....

*नववर्ष साजरे करताना*

   हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्याला सुरू होते त्यामुळे डिसेंबर नंतर येणारा जानेवारी हा महिना म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला दिवस आता त्याचा आनंद साजरा करायचा की नाही याविषयी आपल्याकडे बऱ्याच चर्चा होत असतात त्या फक्त नवीन वर्षाबद्दलच मर्यादित नसून अनेक सणावारांपासून तर अगदी वाढदिवस साजरे करायचे की नाही याबद्दल देखील कायम होत असतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की जर जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, वाढदिवस साजरा करणे ही आपली पद्धत नाही,अनेक असे सण उत्सव आहेत जी साजरे करणे आपल्या हिंदू धर्माला मान्य नाही, मग यांची सुरुवात झाली तरी कुठून, अगदी लहानपणापासून मराठी शाळेत शिक्षण घेत असताना देखील दरवर्षी Happy New year हे शब्द आमच्या कानावर टाकले कुणी,, 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी फिक्स असते,, नवीन वर्ष म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी अनेक जाहिराती लावल्या जातात डिस्काउंटच्या,, बऱ्याच वस्तूवर सूट देखील दिली जाते नवीन वर्षाच्या निमित्ताने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा न देणारे देखील या ऑफर्सची आतुरतेने वाट बघत असतात अगदी छोट्या छोट्या गल्लीपास...

माझ्या शाळेतील ही इयत्ता नववीची मुलं ने नाट्य सादरीकरण सोहळा साजरा

शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ माझ्या शाळेतील ही इयत्ता नववीची मुलं आहेत.... स्थानिक पातळीवर घेतलेल्या नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयाचं बक्षीस पटावलं... एक समाधान व आनंद आहे की या मुलांची तालीम मी मागील काही दिवसांपासून घेत होतो... शनिवारी नाट्य सादरीकरण होतं... परंतु मी नेमका याच दिवशी लेणी अभ्यास दौऱ्यासाठी पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर येथे होतो... मी नसतांनाही मुलांनी छान सादरीकरण केले व आज सकाळी शाळेत येताच एक आकर्षक सन्मानचिन्ह घेऊन माझ्याकडे आली व संबंधित इतिवृतांत सांगितला... खूप छान वाटतं आपण अशा कलाकृतीचा एक भाग असतो... संतोष रामचंद्र जाधव  शहापूर जि.ठाणे 7507015488