Skip to main content

Posts

खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची अतिशय दूरावस्था.

पत्रकार कैलास घरत  खारपाडा पेण प्रतिनिधी खारपाडा गावाच्या पूर्वेकडील समर्थनगर लागून असलेल्या  खारपाडा सावरोली सर्व्हिस रोड ची दूरावस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खारपाडा पासून  10 ते 12 किलोमीटर वर असणाऱ्या ॲद्दिशनल पाताळगंगा एमआयडीसीमध्ये अनेक पुरुष आणि महिला कामगार या ठिकाणांहून  दररोज जातात त्यात अनेक वाहनांची वर्दळ असते.              खारपाडा ते चावणे गाव दरम्यान जवळजवळ 17 ते 18 मोऱ्यांची कामे केली परंतु मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डांबरीकरण केलेले नाही दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. वाहन चालक आणि चाकरमान्याना खड्यांचा सामना करीत जीव मुठीत घेवून गाड्या चालवाव्या लागतात. अनेक अपघात होत आहेत.  या खड्डामुळे अनेकांना कंबरदुखी, मानदुखी आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.             गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा लेखी तक्रार, पत्र व्यवहार दे...

नागपंचमी

पंचमीचा सण आला  चला बाई माहेराला  आला भाऊ न्यावयाला  बैलगाडी बसायला  पहिलवान माझा भाऊ  याला गं काय मागु  आयुष्य त्याला राहो  हेचं देवाजीला सांगु  बैलगाडी खुळू खुळु  सर्जा राजा संगतीला  बारा बिग्याची जमीन  माझ्या भावाच्या जोडीला  रानामध्ये जाऊ चला  नागोबाला पुजायला  वारुळाची करु पुजा  दुध लाह्या नैवेद्याला  झोका बांधु डहाळीला  भिडे उंच आभाळाला  गाऊ नाचु होऊ दंग  गाणी गात नागोबाला  माहेरच्या अंगणात  जमल्यात साऱ्याजणी  हितगुज करूयात  एकमेकी कानोकानी  सण नाग पंचमीचा  आला आनंद घेऊनी  एकमेकां टाळी देऊ  जमल्यात साऱ्याजणी   *शीला पाटील. चांदवड.*

विषय: " नागपंचमी

पावसाचा लपंडाव  खेळ खेळती सरी , सोन पिवळे ऊन  लकाके सर्व दूरवरी. ॥१॥ पहिला वहिला सण  श्रावणातला लय भारी , अशा उत्सवाची झुंबड  घेऊनी येई श्रावण खरोखरी.॥२॥ बळीराजा हा असे कैवारी , नाग राजाची मूर्ती  पुजुया मनोभावे घरोघरी .॥३॥ रुसला पर्जन्य राजा  मदत ना मिळे कोणाची, परी नागराजा तुच खरा सखा पाठ राखतो बळी राजाची.॥४॥ रक्षण करूया नाग राजाचे, जतन करूया अपुल्या निसर्गाचे. ॥५॥ कालीया नागास केले चारी मुंड्या चित, यमुना नदीपात्रातुनी श्रीकृष्ण वर आले सुरक्षित.॥६॥ श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर            सहाय्यक शिक्षक  मोहिते पाटील विद्यालय , मानखुर्द  मुंबई- ४०००४३. भ्रमण ध्वनी क्र.८१०८४६९६३५

*नागपंचमी निमित छोटासा लेख*

आपल्या भारत देशामध्ये वैविध्य जाती, धर्म, संप्रदाय आणि पंथाला माणनारी माणसं, आनंदाने मिळून मिसळून राहतात. आपल्या भारत देशात प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग होळी, दिवाळी, दसरा आणी त्याचप्रमाणे प्रत्येक सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. तसाच एक आपला पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी हा देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी हा सण गावाप्रमाणेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रियामंडळी एकत्र येऊन जंगलात अथवा गावालगत असणाऱ्या वारुळाची पुजा करतात  आणि त्या वारुळाजवळ दूध ठेवल्या जाते. किंबहुना वारूळ हे वाळवी व मुंगीचे निवासस्थान आहे. आणि कधी कधी सापही आपला आसरा शोधतो आणि सुरक्षिततेसाठी वारुळात राहतो. पण जे दूध आपण वारुळासमोर सापाला पिण्यासाठी ठेवतो ते आता कुठेतरी थांबवले पाहिजे आणि टाळले पाहिजे. किंवा सापाला दूध पाजणे हे बंद केले पाहिजे. कारण मुळात दूध सापाचे खाद्य नाहीच आपण सापाला दूध पाजतो जे सापाचे पेय अन्न नाहीच. दुसरीकडे दूध पाजल्याने सापाच्या शरीराची यंत्रणा बिघडते आणि तो लवकरच मरतो दूध ...

सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी, पुणे ३५,येथे क्रांतीदिनानिमित्त बालसभा.

  पुणे:- गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २४ रोजी सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथे क्रांती दिनानिमित्त उत्साहात बालसभा पार पडली.इयत्ता सहावीच्या वर्गाकडे या सभेचे नियोजन होते.सभेचे अध्यक्षस्थान ६ वी अ मधील शिवम कांबळे ने स्वीकारले,तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.संगीता गुरव मॅडम या होत्या.तु बुध्दी दे या प्रार्थनेने सुरुवात करून सर्व बालसभा सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा प्रज्वलन झाले.६ वी मधील विद्यार्थ्यांनी स्वागतम् शुभ स्वागतम् हे स्वागत गीत सादर केले.संस्थेचे संस्थापक माननीय दाभाडे सर,प्राचार्या सौ.वाळुंज मॅडम,उपप्राचार्य श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षिका सौ.घावटे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ६ वी ब मधील रूद्र कदम ने केले तर निवेदन ६ वी अ मधील दिपल पाटील व मीरा मगर यांनी केले. "थोर क्रांतिकारक" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे परीक्षण मावळे सरांनी केले.यात विघ्नेश सोळसे,श्लोक गुंजाळ,साई माळे,गौरव अडागळे,मयूर पाटील,संस्कार मेनकर, जान्हव...

*श्रावण सरी येतात तेव्हा .....!!*

"श्रावणमासी हर्षमानसी   हिरवळ दाटी चोहीकडे   क्षणात येते सर सर शिरवे  क्षणात फिरुनी ऊन पडे    खरंच श्रावण महिना म्हटलं की, बालकवींची ही कविता आपसूकच आठवते. आणि मनात गुणगुणायला सुरुवात होते. या कवितेतून बालकवीने निसर्गाचे सुंदर वर्णन केलेले आहेत. श्रावण महिन्यात आपल्याला या सृष्टीचे सुंदर रूप बघायला मिळते. पावसाच्या रिमझिम सरी....!अंगाला झोंबणारा गारवा.....!! विजांचा गडगडात....जणू काही कानाचे पडदे मेंदूपर्यत जाणारा तो आवाज .....!! पांढऱ्या शुभ्र नभात काळ्याकुट्ट ढगांना आपल्या कुशीत सामावून घेतांचे ते विलोभनिय दृश्य काही वेगळेच .....!आसुसलेली सोनकिरणे, वसुंधरेच्या भेटीसाठी जीवाचा आकांत करीत मिलनाची वाट बघते.....!!जणू एखाद्या समारंभासाठी सज्ज होऊन नटून थटून हिरवा शालू परिधान करून सजलेली सुंदर दिसते. तिचे हे रूप बघून मन अगदी प्रफुलित होते.  आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला बघायला मिळते. ऊन पावसांच्या खेळाचा हा महिना कधी कधी आभाळ मेघाने पूर्ण झाकोळून जाते. तर कधी लखलखीत ऊन पडते. तापलेल्या उन्हात पावसाच्या सरीने वातावरणाला पुन्...

*देवपूजा*

आज मूळ श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी' .नागपंचमी म्हटले की आठवण होते ती झाडावर बांधलेल्या झोक्याची,गोड नैवेद्याची .या सणाच्या पारंपरिक कथा सर्वांनाच माहीत आहे. स्त्रिया या सापाला भाऊ मानून त्याची मनोभावे पूजा करतात . परंतु या ठिकाणी भूतदया दाखवणे हाच एक उद्देश आहे .काही गारुडी या मुक्या प्राण्याला टोपलीत बंद करून त्याला जबरदस्तीने दूध पाजून लोकांच्या भावनेशी खेळताना दिसतात. गरीब भोळी जनता या अंधश्रद्धेला बळी पडते . अनेक लोकांचा अंधविश्वास आहे की नागाला दूध पाजण्याने नाग देव प्रसन्न होतात. परंतू हा गैरसमज आहे कारण नाग कधीच दूध पीत नाही. दूध हे सापाचे नैसर्गिक अन्न नाही. नाग दूधच काय कोणताही पेय पदार्थ पीत नाही. चुकीने दूध प्यायला तर त्याची मृत्यू होऊ शकते. मग अशात पूजा काय कामाची? अशाने फल मिळण्याऐवजी मृत्यूचा दोष लागू शकतो. त्या पेक्षा एखाद्या गरिबांच्या मुखी हे दूध गेले तर नक्कीच पुण्य मिळेल. देवाला किंवा या सापाला काय अर्पण करता हे महत्वाचे नसते.या सर्व दिखाव्याच्या गोष्टी आहेत. मनातील भक्तिभाव महत्वाचा असतो. भुकेल्यांच्या मुखी अन्न घालणे ही सर्वात मोठी देवपूजा आहे...