Skip to main content

Posts

🙏 सेवा 🌹

 पाटी पुस्तक ज्ञानदेवता  'सेवा'शिक्षकांची ढाल  संस्कार शिदोरी घेऊन  उजळू यशस्वी मशाल...१  साक्षरतेचा मंत्र जपण्या  निरक्षरता समूळ दूर करु   विज्ञानाच्या दिव्य तेजाने  ध्येयाचा गाठू महामेरु ...२  शिस्तीचे करून पालन  देतो आम्ही आकार  करू अनेकविध क्षेत्रात  स्वप्न विद्यार्थ्यांचे साकार...३  करून ज्योतीस प्रार्थना  दे आम्हांस सूर्यतेज   सुखसमृद्धीची पहाट  घरोघरी उजळतो आज...४  सौ जयश्री पंकज बोरसे,   कल्याण( सहशिक्षिका:  बालभवन मराठी प्राथमिक शाळा अंबरनाथ )

*पलपब प्रकाशन द्वारा पुस्तक चर्चासत्र : साहित्यिक संवादाचे नवे पर्व*

 एक सप्टेंबर 2024 रोजी  पलपब पालघर समितीने  कवी जयराम कराळे लिखित  'भावतरंग'  या काव्यसंग्रहाच्या  ऑनलाइन  चर्चासत्राचे  आयोजन केले.  पलपब प्रकाशनाच्या कार्यकारी अधिकारी  मा. सौ. लीना पाटील मॅडम, पलपब  प्रकाशनचे  महाराष्ट्र अध्यक्ष  मा.श्री  किरण तोडकर सर  यांच्या  उपस्थितीत  व  मार्गदर्शनाखाली पलपब   पालघर समितीचे  जिल्हाध्यक्ष मा.श्री   संदीप पवार सर  व इतर कार्यकारणी सदस्य  यांनी  भावतरंग या पुस्तकाचे  ऑनलाइन चर्चासत्र  आयोजित केले. पलपब   पालघर समितीचे जिल्हाध्यक्ष  श्री संदीप पवार सर  यांनी  कार्यक्रमाच्या सुरुवातीला  या चर्चासत्राचे अध्यक्ष  ज्येष्ठ कवी  लेखक  मा. श्री  गणपतराव कणसे  सर  प्रमुख पाहुणे  कवी  व लेखक  मा. श्री  सुहास राऊत सर  कवी व लेखक  मा.  प्रतीक मतकर सर  यांचे  शब्दसुमनांनी स्वागत  केले.  तसेच  '...

*कवी कट्टा च्या पाऊसधारा कविसंमेलनात बरसल्यास शब्दांच्या सरी..*

_______________________________ • नांदेड जिल्ह्यातून कवींची उपस्थिती. • मान्यवरांनी केले अनमोल असे मार्गदर्शन ________________________________ आज नांदेडमध्ये कवी कट्टा समुहाच्या वतीने पाऊसधारा ऑनलाइन कवी संमेलन एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध कवयित्री अशा पैठणी मॅडम या होत्या तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सर प्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले, प्रसिद्ध साहित्यिक पंडित पाटील, प्रसिद्ध उद्योजक बालाजी ईबितदार तसेच प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर माधव विभुते सर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती..तर उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन माननीय राजश्री विभूते-हिमगिरे यांनी केले तर कवी संमेलनाचा सूत्रसंचालन माननीय रुचिरा बेटकर यांनी केले पाऊस धरा कवी संमेलनात अलका मुकटकर, ज्योती परांजपे,शंकर माने,पवन कुसुंदल,जीवन मांजरमकर,राजश्री विभूते,गोदावरी गायकवाड, दत्ता वंजे,नागोराव डोंगरे, रुचिरा बेटकर,अनिरुद्ध वाघमारे,गंगाधर ढवळे, उषा ठाकूर, जगन्नाथ पाटील,एन.सी.भंडारे,मारूती मुंडे, मदन अंभोरे, डॉ. पुष्प...

कविता - बैलंपोळा

माझी खिल्लारी बैलाची जोडी  मोत्या पोवळ्या नावं त्यांची  रुबाबदार जोडी सर्वांना आवडी  मेहनतिने काळजी घेतात शेताची  शेतकऱ्यांना आधार बैलांचा  कामात उरक असे शेतीचा  लक्ष्मी ही शेतकऱ्यांची,,,, शोभा वाटे अंगणाची,,,,, वर्षाचा सण हा बैलपोळा  शेतकरी आनंदाने साजरा  करतो आवडीने सोहळा  झुल अंगावरी हाती कासरा,,,,, नवरदेव रंगतो विविध रंगानी  गळ्यात सुंदर घुंगर माळा,,,, शिंग शोभतात लोंबणाऱ्या गोंड्यानी  मिरवणूकित उडवतात धुराळा,,, जेवण आज त्यांना पुरणपोळीचे  मुटकुळे बाजरीच्या पिठाचे,,,,, ओवाळते सुवासिन जोडीला  वर्ष सरते कष्टात शेतकऱ्याचे,,,,, दत्तकन्या

बैलपोळा........

सालभर करतात कष्ट बैलजोडी शेतात राबून  ! आज त्यांचा सण बैलपोळा धन्यता मानू आराम देऊन.. आज बैलजोडीला स्वच्छ धुवू छान आंघोळी घालून  ! शिंगांना रंग देवू अन् सजवू बेगड लावून.. नवी वेसण, नवा कासरा गळ्यात घालू घुंगरूमाळा ! पाठीवर नवी झुल घालू असा साजरा करू पोळा.. असा मान सन्मान करू आज आपल्या बैलजोडीचा ! वाटेल त्यांनाही आनंद अन् जाईल दिवस त्यांना सुखाचा...    ©  अनिल दाभाडे           रसायनी 🙏🌹... बैलपोळा सणाच्या निमित्ताने  सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🌹🙏

: सर्जा राजा सजले भारी शिर्षक: सण बैल पोळा

  पिठोरी श्रावण अमावस्येला  आला सण बैल पोळा , बैल पोळा सण साजरा करण्यास गाव सारा झाला गोळा. ॥१॥ नदीवर पहाटेस घालून मनसोक्त आंघोळ , अन गळ्यात घालू घुंगर माळ  शिंगे रंगवून बाशिंग बांधून लडिवाळ. ॥२॥ मखमलीच्या झुलीनी  सर्जा राजा सजले भारी  , पंचारतिचे ताट घेऊन बळीराजाची  कारभारीन स्वागत करी .॥३॥ गोड पुरण पोळीचा  नैवेद्य खाऊ घाली प्रेमाने, सर्जा राजा जाई आनंदुन डोळ्यात येई  अश्रू दाटून .॥४॥ वर्षभर शेतात बळीराजा   सोबत सर्जा राजा राबतोय दिन रात , म्हणून बळीराजाचे कुटुंब  सुखाचे दोन घास खाई आनंदात .॥५॥ श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर कामोठे, नवी मुंबई तालुका: पनवेल  जिल्हा: रायगड  भ्रमणध्वनी क्रमांक: 8108469635

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडला. तसेच आयकर भरण्यासाठी काही बदल केंद्र शासनाकडून करण्यात आले

आयकर भरण्यासाठी करदात्याला दोन प्रकारचे नियम लागू आहेत. १) जुने नियम याचा अर्थ ओल्ड स्लॅब ( Old Slab) २) नवीन नियम याचा अर्थ न्यू स्लॅब ( New Slab) या दोन्ही नियमांचा  जर अभ्यास केला तर नवीन नियमात सरकारने करदात्याला अनेक गोष्टींपासून वंचित ठेवले आहे. जसे की, 1) Section 80 C अंतर्गत  PF निधी, LIC,National Pension scheme,Home Loan   Principal Amount,Tuition fees, 2) Section 80 D अंतर्गत Medical Insurance,HRA,Home Loan Intrest 3) Section 80 E अंतर्गत Education loan Interest 4) Leave Travel Allowance 5) Section 80 G चॅरिटेबल संस्था यांना दिलेली देणगीवर कर सवलत 6) अपंग व धर्मार्थ यांना देण्यात येणाऱ्या देणगी वर सवलत 7) Section 16 अंतर्गत करमणूक भत्ता आणि नोकरी व्यवसाय करात सवलत 8) कौटुंबिक पेन्शन साठी 15000 मिळणारी सवलत 9) P.T Professional Tax या अनेक सवलती पासून नवीन नियमात कर दात्याला वंचित ठेवले आहे. खरंतर आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा विचार केला तर असे लक्षात येते की आपल्या देशात ७५ ते ८० टक्के लोक सामान्य नोकरी करतात. जसे की, शासकीय,निमशासकीय, महामंडळ ,शा...