Skip to main content

Posts

दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत18चे सहसंपादक विलास बडे यांची उपस्थिती ठरली खास आकर्षण

पनवेल प्रतिनिधी  वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधार ने पनवेल शहरांमध्ये दिमाखात पाऊल ठेवले होते दर्जेदार बातम्या व लेख यामुळे वाचकांच्या पसंतीस हे वर्तमानपत्र पडले आहे. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार या दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा परिणीता फाउंडेशनचे  विशेष सहकार्य  लाभलेला वर्धापन  सोहळा  जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत18 चे  सहसंपादक विलास बडे ऋषिकेश राजकिरण प्रसिद्ध अभिनेता डॉ. नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल  प्रशांत सागवेकर वृत्त निवेदक जय महाराष्ट्र न्यूज चैनल दैनिक युवाक आधारच्या मुख्य संपादक  भारती संतोष आमले यांच्या उपस्थित मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन  डॉ.नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा विभाग संपादक जगन्नाथ रासवे सर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये जय महाराष्ट्र चॅनलचे वृत्त निवेदक प्रशांत सागवेकर यांनी घेतलेली मुलाखत जय महाराष्ट्र न्यूज चैनलचे संपाद...

एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाची आक्रमकता वाढत आहे...... पत्रकार भारत कवितके.

भारत कवितके मुंबई कांदिवली   सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाजाचे 6 मल्हार यौध्दे (समाज बांधव) आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यानंतर लातूर, नेवासा या ठिकाणी ही धनगर समाज बांधव उपोषणाला बसले आहेत.धनगर समाजाची एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार भारत कवितके यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरकार जरी सकारात्मक असेल तरी कायद्याच्या चौकटीत टिकणारे एसटी आरक्षण अमंलबजावणी करण्याची तयारी दाखवली आहे.त्या करिता कमिटी स्थापन करुन लवकरच निर्णय घेतला जाईल.असे कळविले आहे.पण आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांनी हातात एसटी आरक्षण अमंलबजावणी प्रमाणपत्र पडल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.असा निर्णय घेतला आहे.आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण, तहसीलदार यांना निवेदन देणे, उपोषण स्थळी विष प्राशन करून करणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे, समाजातील महिला विश्रांती ताई भुषनर यांनी उपोषण स्थळा पासून थोड्या अंतरावर असलेल्या...

*नाशिक कवीचा मासिक काव्य मेळावा रवि.दि.२२ सप्टें.रोजी**अध्यक्षस्थानी बाळासाहेब मगर**जेष्ठ कवी नवनाथ गायकर नवोदितानां मार्गदर्शन करणार*

---------------- ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन- -------    नाशिक कवीचा सप्टेंबर महिन्याचा मासिक काव्य मेळावा रविवार दि. २२/९ / २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता, नाट्यपरिषद हॉल, कालिदास कला मंदिर, शालिमार,नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती नाशिक कवीचे कार्यवाहक नंदकिशोर ठोंबरे,उपाध्यक्ष यांनी दिली आहे.    नाशिक कवीच्या या काव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मा.बाळासाहेब मगर,नाशिक हे असणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा व्याख्याते मा.नवनाथ अर्जुन पा. गायकर,ईगतपुरी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गायकर हे नवोदित कवीनां मार्गदर्शन करणार आहेत.   दरम्यान सदर काव्य मेळावा हा कवी व काव्य रसिकांसाठी खुला असुन सहभागी कवीस सादरीकरणासाठी तीन मिनिटे दिले जातील.सादर करावयाच्या कवितेला विषयाचे बंधन नाही अशीही माहिती ठोंबरे यांनी दिली आहे.    कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नाशिक कवीचे कार्याध्यक्ष शरद पुराणिक,कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे,उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, सहकार्यवाह किरण मेतकर, गोरख पालवे, सौ. भारती देव स...

गोमंतकीय स्त्री लिखित कविता ग्रंथासगोवा मराठी अकादमीचा पुरस्कार

पणजी, ता.‌  गोवा मराठी अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून, संपादित ग्रंथ विभागात गोमंतकीय स्त्री लिखित कविता २००१ ते २०२० या चित्रा प्रकाश क्षीरसागर व डॉ. नीता तोरणे संपादित प्रातिनिधिक कविता संग्रहास एस. एस. नाडकर्णी स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. या ग्रंथात गोव्यातील नामांकित व नवोदित २३ कवयित्रींच्या प्रत्येकी दहा अशा २३० कविता आहेत. या ग्रंथाला श्रीकृष्ण अडसूळ यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.  दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष व कथाकार मिलिंद जोशी यांच्या हस्ते वास्को येथील रवींद्र भवनात हा पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांसाठी कथा, कविता, चरित्र आदी प्रकारातील ४७ पुस्तके आली होती. चित्रा क्षीरसागर या कवयित्री व संपादिका आहेत. त्यांचा कवितेचे झाड हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कविता रसग्रहणावर आधारित संग्रह तसेच प...

सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांचे तर्फे वृदधाश्रमात सहकार्य...गणेश हिरवे

...मुंबई प्रतिनिधी...गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस नेते सुनील कुमरे यांनी यंदा गणेशोत्सवा निमित्त दिनांक १५ सप्टेंबर रोजी अंधेरी चकाला येथील होम फॉर एज या वृद्धाश्रमात कार्यकर्त्यांसह जाऊन जवळपास शंभर वृध्दाशी संवाद साधून त्यांची सुख दुःख जाणून घेऊन त्यांना अनेक प्रकारची फळे, साबण, तेल बॉटल, दूध पावडर, चहा पावडर आदी वस्तू देऊन सहकार्य केले. कुमरे यांचे काम चांगले असून ते विभागातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात.अनेक मंडळे आणि सामाजिक संस्थांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत.  कुमरे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष समाजसेवक असल्याने त्यांचा मोठा आधार असल्याचे अनेकांनी वारंवार बोलून दाखविले आहे. यंदा कुमरे यांनी कोणतेही शुभेच्छा बॅनर न लावता त्या रकमेमधून या वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले. वाढदिवस आणि इतर अनेक शुभ प्रसंगी होणारे मोठ मोठे खर्च आपण नक्कीच टाळायला हवेत आणि या बचती मधून गरजूंना सहकार्य करायचे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले आहे.वस्तू वाटप करण्यासाठी धर्मराज तोकला...

प्रसिद्ध कवी.संदीप पवार यांचा समाजभान जागृत करणाऱ्या ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला सरकारमान्य मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर

नुकताच आदर्श शिक्षक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध कवी संदीप पवार लिखित व पलपब प्रकाशनद्वारा प्रकाशित समाजभान जागृत करणारा ' प्रतिकार ' काव्यसंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा " राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार " जाहीर झाला आहे .हा पुरस्कार ३ ऑक्टोंबर रोजी ठाणे येथे पुरस्कृत करण्यात येणार आहे . कमी कालावधीत जनमाणसात पोहचलेला काव्यसंग्रह वाचकांच्या मनात ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.' प्रतिकार ' या काव्यसंग्रहाचे यश आणि कवी.संदीप पवार यांच्या साहित्य सेवेचे  कौतुक म्हणून पलपब पब्लिकेशनद्वारा यावर्षी त्यांना "राज्यस्तरीय पलपब जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने गौवरव करण्यात आला .प्रतिकार काव्यसंग्रहाचा आलेख आणखीनच वाढत चाललेला आहे .या काव्य संग्रहाच्या प्रती वाचकांसाठी  पलपब बुक स्टोरवर आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे .तसेच संदीप पवार यांच्या व्हॉट्सअँप नंबर ९२०९७७७७८५ या क्रमांकावरून कॉल करून आपली प्रत मागवू शकता . लिमिटेड स्टॉक उपलब्ध आहे .