Skip to main content

Posts

येवती येथे भोई समाज संघटनेची सभा संपन्न प्रलंबित प्रश्न व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चात्मक प्रकाश

सुनील शिरपुरे/यवतमाळ महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेचे वतीने भोई समाजाचे प्रलंबित घरकुल, रोजगार, मासेमारी, शिक्षण, विधवा महिलांचे प्रश्न, इतर व्यवसाय, वसतिगृह तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, राळेगाव येथे भोई समाज जोडो कृती कार्यक्रम, वधुवर परिचय मेळावा घेण्याकरिता सद्गुरु संत सोनामाता मंदिर डोमाघाट येवती येथे वडकी जिल्हा परिषद गणातील भोई समाजाच्या निवडक कार्यकर्त्यांची भोई समाजाचे नेते श्री मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात सभा घेऊन वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. भोई समाजाचे प्रलंबीत प्रश्न मांडण्याकरीता कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. राळेगाव येथे भोई समाजाचा भव्य मेळावा घेण्याकरीता ठराव घेण्यात आला तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता प्रतिनिधित्व करण्याचे एकमताने ठराव करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते मा.श्री रामकृष्णजी घरडे होते. . अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सांगितले की, भोई समाज अतिशय मागास आहे. भोई समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या प्रत्ये...

आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न !

मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास,संवर्धन व्हावे,विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृ‌भाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते . त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन . नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते .या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे .आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. मोहन कांबळे. प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे,यांनी भूषविले. मा . डॉ वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  मा. प्रज्ञा .देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्या सुमधूर...

*६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून "पाकीट" प्रथम*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या "पाकीट" या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या "लिअर ने जगावं कि मरावं ?" या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी ९ डिसेंबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.  सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-१ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-    गोदरेज ॲण्ड बॉयज श्रमिक संघ, मुंबई या संस्थेच्या 'मेला तो शेवटचा होता' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक योगेश कदम (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक अभिमान अजित (नाटक- पाकीट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक  संजय तोडणकर (नाटक- ती रात्र), नेपथ्य : प्रथम पारितोषिक र...

"पेरणी" या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त...

कन्नड : महाराष्ट्राभरात आपली  कवी म्हणून छाप पाडणारे  वेगवेगळ्या दैनिकातून,दिवाळी अंकातून, साप्ताहिकातून, सोशल मेडीयातून नेहमी साहित्यात चर्चेत असलेला कवी  शेती माती , सामाजिक जीवनाची जडणघडण ,लिहिणारा आणि जगणारा कवी  गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत आपल्या नावाची थाप  पाडणारा  नामवंत कवी श्री.ज्ञानेश्वर गायके     जनसामान्यांनी मान्य केलेली लेखणी आता  साहित्य मंडळानेही मान्य केली. खऱ्या अर्थाने राजकवी होण्याचा शिक्का मोहर्तब झाला‌. त्यांच्या लेखणीला  "पेरणी" या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवलेखक अनुदान देऊन 'पेरणी' काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय दिला. "अनघा प्रकाशन" ठाणे येथून ते प्रिंट होऊन वाचकांना वाचायला मिळेल..आपल्या माणसाच्या सन्मानाचे कौतुक करतांना कवी -प्रवीण दाभाडे सर व समस्त साईबाबा कॉलनी मित्र परिवारांनी  पुढील वाटचालीसाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. ----------------

*ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड*

ग्रामीण हास्य कवी  म्हणून प्रसिद्ध असणारे ग्रामीण कवी श्रीराम विध्यासागर घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या *भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या "महाराष्ट्र राज्य समन्वयक" पदी      नुकतीच निवडकरण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, काव्यक्षेत्राची तसेच शेती मातीची जाण असणारे ,शेतकरी पुत्र ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन आपला सांस्कृतिक वसा आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे ,एकदम सोप्या शब्दात सर्वांना आपलेसे करणारे आणि आपल्या काव्यातून श्रोत्यांना खळखळून हसवणारे ग्रामीण हास्य कवी अशी महाराष्ट्र भर ओळख निर्माण करणारे ग्रामीण कवी , गीतकार, निर्माता अशा अनेक भूमिका निभावणारे तसेच स्वतः च्या आणि कवी आणि कवयित्री यांच्या कवितेला संगीत बद्ध करून सर्वांचे मनोरंजन करणारे कवी श्रीराम घडे सर यांची साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आवड पाहून, साहित्य क्षेत्रातीलविविध समस्या सोडवण्यासाठी , समूहासाठी वेळोवेळी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून त्यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या "महाराष्ट्र राज्य समन्वयक" प...

अंगुलिमाल उराडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा"हे विश्व शब्दांचे" या नावातच व्यापकता

सुनील शिरपुरे/यवतमाळ चंद्रपूर:-१ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा "हे विश्व शब्दांचे" हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या "हे विश्व शब्दांचे" या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे.             या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात "हे विश्व शब्दांचे" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श...

*५० तास अखंड वाचन यज्ञात झाला,**आगरी बोली कवितांचा जागर*

 प्रतिनिधी / कल्याण           आगरी बोलीतील कवितांची गोडी आज कल्याणकरांना अनुभवता आली. निमित्त होते अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित सलग पन्नास तासांचा अखंड वाचन यज्ञ हा कार्यक्रम. यावेळी आगरी कवींनी विविध आशयाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.           आगरी कवितांचा हा कार्यक्रम तीन सत्रात घेण्यात आला. यात कविता, चारोळ्या, पारंपारिक गीते, लग्न गीते, धवला असे आगरी साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यात आले. या कवी संमेलनात कवितांना पार्श्वसंगीत देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासाठी संगीत संयोजक 'आपला बंड्या' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. एल. बी. पाटील सर, प्रसिद्ध साहित्यिक अनंत शिसवे, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण पन्नास तासांच्या सत्रात कविता वाचन, कथाकथन, अभिवाचन असे सत्र सुरु होते.         या संपूर्ण कार्यक्रमा...